इंदापूर तहसील समोर मराठा तरुणांचं साखळी उपोषण,अनेक गांवात राजकिय नेत्यांना प्रवेश बंदी
आय मिरर
अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभारलेला आहे. राज्य सरकारने जरांगे पाटील यांकडून 40 दिवसाची वेळ घेतली होती. 24 ऑक्टोबरला 40 दिवसाची वेळ संपूनही राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केलेले नाही. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. जरांगे पाटील यांनी सरकारची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे.
21 ऑक्टोबर रोजी पुण्याच्या इंदापूर मध्ये मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडली होती. यावेळी तालुक्यातील गाव ना गाव पिंजून काढा मराठा जागृत करा,सरकारने जर दिलेल्या वेळेत आरक्षण जाहीर केले नाही तर पुन्हा एकदा आपल्याला ताकतीने लढायच आहे. सुरू असलेलं आंदोलन मोठ्या ताकदीने आणखी पुढे न्यायचं आहे असं आवाहन केलं होतं.
दिनांक 22 ऑक्टोबर रोजी मी पुढील दिशा जाहीर करेल आणि त्यानुसार जरांगे पाटील यांनी 22 ऑक्टोबर रोजी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली. 25 ऑक्टोबर पासून 28 ऑक्टोबर पर्यंत साखळी उपोषण आणि तोपर्यंत जर सरकारने निर्णय घेतला नाही तर राज्यभरातून आमरण उपोषणाचं हत्यार मराठा समाजाकडून उपसले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर इंदापूर तहसील कार्यालयाच्या बाहेर शेकडो मराठा समाज बांधव हे साखळी उपोषणाला बसले आहेत.
इंदापूर तालुक्यातील गावांत राजकिय नेत्यांना प्रवेश बंदी - मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवृष्टीकडे चालला असून इंदापूर शहरासह तालुक्यातील पळसदेव, गालांडवाडी नंबर एक, सरडेवाडी, हिंगणगाव, कांदलगाव, कुरवली,हिंगणेवाडी वडापुरी, गंगावळण यासह अनेक गांव राजकिय नेत्यांना कोणताही राजकिय कार्यक्रम घेण्यावर बंदी घातली आहे,तर काही गावांनी राजकिय नेत्यांना थेट गावात प्रवेश नाकारला आहे.
What's Your Reaction?