भरधाव गाडीचा टायर फुटला ! इंदापूरच्या काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाचा मृत्यू…

Jul 16, 2024 - 20:20
 0  6202
भरधाव गाडीचा टायर फुटला ! इंदापूरच्या काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाचा मृत्यू…

आय मिरर

बारामती तालुक्यातील संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर रुई गावाच्या हद्दीत गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झालाय.यात इंदापूर तालुक्यातील सणसरच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. आदित्य आबासाहेब निंबाळकर असे याचे नाव असून तो इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आहे.

आज संध्याकाळी चारच्या सुमारास बारामती तालुक्यातील रुई गावच्या पाटी नजीक हा अपघात घडला. प्रत्यक्ष दर्शिंनी सांगितलेल्या माहितीनुसार आदित्य हा काटेवाडी कडून रुई मार्गे बारामतीत येत होता. त्याच्या चार चाकी गाडीचा टायर फुटल्याने गाडी पलटली व ती एका इमारतीच्या कडेला जाऊन आदळली.यात तो गंभीर जखमी झाला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow