हर्षवर्धन पाटील यांनी घेतली बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट
आय मिरर
भाजप नेते व व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची मुंबईत भेट घेऊन विविध विषयांवरती मंगळवारी (दि.10) चर्चा केली. यावेळी इंदापूर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी निधी मिळणे बाबतच्या मागणीचे पत्र हर्षवर्धन पाटील यांनी बांधकाम मंत्र्यांना दिले.
याप्रसंगी मागणी केलेल्या सर्व रस्त्यांना निधी देण्याची ग्वाही बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. यावेळी निरा भिमा कारखान्याचे संचालक व इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील उपस्थित होते.
What's Your Reaction?