बारामतीतील पराभवानंतर युगेंद्र पवारांकडून ही मत पडताळणीची मागणी,वाचा काय म्हणाले
आय मिरर
बारामतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मत पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे. अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार हे उमेदवार होते. मात्र युगेंद्र पवार यांचा पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे.
आज महाराष्ट्रात संशयाचं आणि संभ्रमाचे वातावरण आहे. राज्यातील अनेक दिग्गज कधीही न हरणारे नेते तिथे हरले आहेत.हे का झालं ? सुप्रिम कोर्टाने आम्हाला हा अधिकार दिला आहे तर मग मत पडताळणी करायला काय हरकत आहे.असं युगेंद्र पवार म्हणाले आहेत.
याचसोबत युगेंद्र पवार यांनी आभार दौरा सुरू केला आहे. बारामती विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवारांनी गावोगावी जावं मतदारांचे आभार मानायला सुरवात केली आहे.काटेवाडी गावातून या आभार दौऱ्याला त्यांनी सुरुवात केली आहे.
ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली आणि ज्यांनी साथ दिली नाही त्यांच्यापर्यंत आपण परत एकदा गेलं पाहिजे आभार मानले पाहिजेत हीच शिकवण पवार साहेबांची आहे.त्यासाठी हा आभार दौरा करत असल्याचं युगेंद्र पवारांनी म्हटले आहे.
लोकसभेनंतर लोकांचा कल बदलला त्याला आम्ही काय करु असं अजित पवार यांनी म्हटलं होतं यालाही युगेंद्र पवारांनी उत्तर दिलं आहे.खरंच लोकांचा तो कल असेल तर तो स्वीकारावाच लागेल. पण नक्की ते का झालं ? कशामुळे झालं ? कुणामुळे झालं ? याचा अभ्यास केला पाहिजे असं युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.
पाच वर्षांनी पुन्हा विधानसभा येईल एवढं बहुमत त्यांना मिळाला आहे महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा बहुमत कोणाला मिळालं नव्हतं तेवढ आता महायुतीला मिळाले आहे.कारखाने,पंचायत समिती,जिल्हा परिषद या निवडणुकीत आम्ही लोकांपर्यंत जाऊ असं ते म्हणाले.
अजित पवार यांचं तुम्ही अभिनंदन केलं का असा प्रश्न पत्रकारांना विचारला असता युगेंद्र पवार म्हणाले की अजून मी करु शकलो नाही पण उद्या जर ते मला भेटले तर शंभर टक्के करेन आणि तुमच्या माध्यमातून पण मी करतो.
What's Your Reaction?