विधानसभेला आमच्या नेतृत्वावर लक्ष ठेवा - हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्याची रावसाहेब दानवेंकडे विनंती

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)
विधानसभेला आमच्या नेतृत्वावर लक्ष ठेवा, राज्यातील सहकार खात्यातील हर्षवर्धन पाटील मोठं नेतृत्व आहेत. दिल्लीत दखल घेतलीये पण तुम्ही विधानसभेला लक्ष ठेवा अशी विनंती भाजप नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनं माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे इंदापुरात केली आहे.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुण्याकडे जात असताना भिगवण येथील एका हॉटेलमध्ये चहासाठी थांबले होते.यावेळी हर्षवर्धन पाटील देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते आणि याचवेळी तक्रारवाडी येथील युवा कार्यकर्ते प्रवीण वाघ यांनी ही मागणी केली.त्यावर दाणवे यांनी सकारात्मक प्रतिसाद होकार दिला.
दाणवे यांनी भिगवण मध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी सहकारातील माहिर असलेले हर्षवर्धन पाटील यांची भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड करून बहुमान दिला आहे परंतु इंदापूर विधानसभेसाठी त्यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाची पक्षाने दखल घ्यावी अशा प्रकारची मागणी तक्रारवाडीचे युवा कार्यकर्ते प्रवीण वाघ यांनी केली.
यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलास वाघमोडे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मारुती वणवे,कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक पराग जाधव, संपत बंडगर,इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन अशोक शिंदे, कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक यशवंत वाघ,इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे, भिगवणचे सरपंच प्रतिनिधी तुषार क्षिरसागर,इंदापूर अर्बन बँकेचे संचालक संजय रायसोनी, रणजित जाधव, जावेद शेख, प्रशांत वाघ विकास वाघ,कपिल भाकरे, दत्ता धवडे, अमर धवडे, सुनिल काळे आदि कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






