इंदापूरात भिगवणमध्ये पिकअप पलटली,चालक गंभीर जखमी

Jul 17, 2024 - 16:12
Jul 17, 2024 - 16:17
 0  1487
इंदापूरात भिगवणमध्ये पिकअप पलटली,चालक गंभीर जखमी

आय मिरर

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण येथे वाहनबचालकाचा ताबा सुटल्याने शेतमाल वाहतुक करणारी पिक अप रस्त्यावर पलटी झालीय. यात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे.

हा अपघात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मदनवाडी येथील उड्डाण पुलावर झाला असून वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे उमेश जाधव,अक्षय बोरकर, महामार्ग पोलीस राक्षे आणि नितीन वाघ व भिगवण पोलीसांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहन बाजूला केले.

मिळालेल्या माहितीनुसार शेतमाल घेऊन पुण्याच्या दिशेने निघालेली ही पिक अप गाडी होती. मोबाईल वर बोलत असताना त्याचा ताबा सुटला आणि ती रस्त्याच्या कडेला कठड्याला धडकून पलटी झाली.सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow