अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लागली - खा.सुळेंचा इंदापूरात आरोप

आय मिरर(देवा राखुंडे)
अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लागली असल्याचा आरोप बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या इंदापूर तालुक्यातील विविध पदांच्या नियुक्ती व बूथ कार्यकर्ता मेळाव्या नंतर खा.सुळे पत्रकारांशी बोलत होत्या.
यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे अध्यक्ष ॲड.तेजसिंह पाटील कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, प्रदेश सरचिटणीस अमोल भिसे, अशोक घोगरे, कालिदास देवकर, किसन जावळे, ॲड.इनायत काझी, ॲड.आशुतोष भोसले, ॲड. प्रीतम सूर्यवंशी, छाया पडसळकर, रेश्मा शेख, विकास खिलारे, यांचेसह मोठ्या कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांना तालुक्यात फिरू न देण्याचे धमकीच्या प्रश्नावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या ज्या व्यक्तीने आपलं आयुष्य राजकारणासाठी घालवलं त्या माणसाला धमक्या देणे दुर्दैवी असून गृहमंत्री असताना भीती राहिली नसल्याचे सांगत बारामती मतदार संघात कुणालाही धमकी दिली ती सहन करणार नाही असाही इशारा दिला.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बोलताना म्हणाल्या, असे निर्णय जयंत पाटील आणि वरिष्ठ पातळीवर होतात मला माहित नाही. तर अजित पवार गटाला तीन जागा देत भाजप अजित पवारांचे खच्चीकरण करत आहे का या प्रश्नावर बोलताना "मै दुसरों कीं घर नहीं झाकती" असे उत्तर दिले.तर जल जीवन योजनेत घोटाळा झाला आहे असे इथे माझ्या कानावर येत आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी असल्याचं सुळे म्हणाल्या.
What's Your Reaction?






