राज्यातील जनतेला नूतन वर्ष सुख, समाधान व आनंदाचे जावो- माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील

Apr 9, 2024 - 10:07
Apr 9, 2024 - 10:09
 0  161
राज्यातील जनतेला नूतन वर्ष सुख, समाधान व आनंदाचे जावो- माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील

आय मिरर

राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांनी इंदापूर येथील आपल्या भाग्यश्री निवासस्थानी चैत्रशुद्ध गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढी उभारली. सर्व जनतेला नूतन वर्ष सुख समाधान व आनंदाचे जावो अशी सदिच्छा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली.यावेळी भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' चैत्र्य शुद्ध गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो. हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात असते. सर्व जनतेला सर्व राज्यांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे हे वर्ष जावो. प्रत्येकाच्या मनात ज्या अपेक्षा आहेत त्याची पूर्तता व्हावी आणि सर्वजण गुण्यागोविंदाने नांदो.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow