'हे राज्य आणि केंद्र सरकारचे पूर्ण अपयश' खासदार सुळेंचा राज्यसह केंद्रावर निशाणा ; वाचा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

आय मिरर
गेल्या 14 दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे राज्य सरकार अद्याप पर्यंत हा प्रश्न सोडवू शकलेलं नाही हे राज्यसह केंद्र सरकारचं मोठं अपयश आहे असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूरमध्ये राज्यासह केंद्रावरती निशाणा साधलाय. मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आम्ही आरक्षण देऊ असे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी आपल्या भाषणातून म्हणतेय. केंद्रात आणि राज्यात त्यांचे पूर्ण सरकार असताना या चारही समाजाचा प्रश्न अध्याप सुटू शकला नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
इंदापूर तालुक्यातील भांडगाव येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन पार पडलेय आणि या नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, धनगर ऐक्य परिषदेचे अध्यक्ष डाॅ.शशिकांत तरंगे,पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ,जेष्ठ नेते अशोक घोगरे,महिलाध्यक्ष छाया पडसळकर,रहेणा मुलाणी,गावचे सरपंच यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
जालन्याची जी घटना झाली ती लाजिरवाणी असून अमानुष पद्धतीने आंदोलकांना मारहाण करण्यात आली. कोणीतरी याचे सखोल चौकशी करावी. महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाच यासाठी जबाबदार आहे. फक्त पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही महाराष्ट्र सरकारने याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. केवळ सर्वपक्षीय बैठक घेऊन हे प्रश्न सुटणार नाहीत महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र अधिवेशन बोलवलं पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या इंदापूरात केलीय.
राज्यात पाऊस फार कमी झाला आहे दुष्काळाची परिस्थिती आहे छावण्या सुरू करण्याची गरज आहे. एवढी मोठी आव्हाने या सरकारच्या समोर असताना सरकार ही काम सोडून नको त्या गोष्टी करतानाच आपल्याला दिसतंय असा टोलाही सुळे यांनी लगावला आहे.
52 आमदारांच्या साह्यांचं ते पत्र मी पाहिलं नाही खासदार सुप्रिया सुळे यांची इंदापूरात प्रतिक्रिया
ज्यावेळी शिंदे गट गुवाहटीला गेला होता.त्यावेळी ५२ आमदारांच्या सह्याचे पत्र घेतले होते जर हे खोटं असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे आणि जर हे खरं असेल तर तुम्ही सोडणार का? असा थेट सवाल अजित पवार यांनी शरद पवार यांना नांव न घेता कोल्हापूरच्या सभेत विचारला होता. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मी हे सह्यांचे पत्र पाहिलेलं नाही त्याची माहिती मला तरी नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुळे यांनी इंदापूर मध्ये दिलीय.
What's Your Reaction?






