देशातील 135 कोटी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करते - हर्षवर्धन पाटील
आय मिरर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या133 व्या जयंतीनिमित्त इंदापूर येथील जेतवन बुद्ध विहार येथे राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की देशातील 135 कोटी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार, सर्वधर्म समभावाचा विचार तसेच शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र प्रत्येकाने लक्षात घेऊन आपल्या आयुष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य करावे अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यात 65 वर्षापर्यंत जगले. त्यांनी या विश्वाला लोकशाही दिली,आरक्षणाचा मंत्र दिला आणि लोकशाहीच्या माध्यमातून समाज संघटित करण्याचे योगदान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वोच्च भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते बॅरिस्टर होते. त्यांनी संविधान लिहिले , घटना लिहिली या संविधानाचा देशातील 135 कोटी जनता आदर करते.यावेळी अनेक मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?