साताऱ्याचा डोंगरी भाग,रात्रीचा काळाकुट्ठ अंधार अन् पाठलागाचा थरार..! इंदापूर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलंच

आय मिरर
इंदापूर पोलिसांच्या पुणे शोध पथकाने शिंदी खु. (ता.माण जि सातारा) येथील डोंगरी भागात रात्रीच्या अंधारात चित्रपट स्टाईल पाठलाग करून खून व खुनाचा प्रयत्न प्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, 27 फेब्रुवारी 2025 रोजी इंदापुर पोलीस स्टेशन हददीतील खोरोची या गावी संकेत हेगडकर यांचेवर बंदुकीने गोळीबार झाला त्यावरुन इंदापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपी नामे निरंजन लहु पवार (रा.खोरोची) व जिजा उर्फ मयुर मोहन पाटोळे (रा.निमसाखर ता इंदापुर) फरार झाले होते.तसेच त्याच दिवशी मौजे निरवांगी (ता.इंदापुर) येथे उत्तम जालींदर जाधव (रा.खोरोची ता इंदापुर) यास निरवांगी हददीत अडवुन त्याचा लोखंडी तलवारीने, दगड व कोयत्याने निर्घृण खुन करण्यात आला होता.सदरचे आरोपी हे वरील गुन्हयात देखील फरार होते.
याबाबत इंदापुर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहीते, सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश माने, पोलीस हवालदार सलमान खान, पोलीस अंमलदार गणेश डेरे, अंकुश माने, विशाल चौधर, तुषार चव्हाण यांचे पथक नेमले. संबंधित पथकास शिंदी खु. (ता. माण जि सातारा) येथील डोंगरावर वास्तव्यात असले बाबत माहीती प्राप्त झाली होती. सदर दोन्ही आरोपी हे आपले अस्तीत्व लपवुन इंदापुर पोलीसांचे हातात कधिच येणार नाही असे दावे करत होते.यावर पथकाने दऱ्यात, रानावनात, डोंगरात आरोपींचा तीन दिवस सातत्याने व शिताफिने शोध घेवुन त्यांना रात्रीच्या अंधारात पाठलाग करत अटक करण्यात यश मिळवले.
What's Your Reaction?






