कांदलगावात घरफोडी,पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास ! अज्ञात चोरट्या विरोधात इंदापूर पोलीसात गुन्हा दाखल

Apr 14, 2024 - 21:14
Apr 15, 2024 - 08:29
 0  1683
कांदलगावात घरफोडी,पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास ! अज्ञात चोरट्या विरोधात इंदापूर पोलीसात गुन्हा दाखल

आय मिरर(देवा राखुंडे )

इंदापूर तालुक्यातील कांदलगाव मध्ये अज्ञात चोरट्याने घरपोडी करत लाखो रुपयांच्या ऐवजावरती डल्ला मारलाय.रविवारी दि.14 एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली असून या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात समाधान दत्तू सरडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात कलम 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेत अज्ञात चोरट्याने रोख रक्कम मिळून तब्बल पाच लाख रुपयांचा ऐवज चोरी केला आहे.

यामध्ये 75,000/- किंमतीचा सोन्याचा नेकलेस,1 लाख 50,000/- किंमतीचा सोन्याचा गंठन, 50,000/- किंमतीचे सोन्याचे कानातील वेल,50,000/- किमतीची कानातील सोन्याची फुले,50,000/- किंमतीची 1 तोळ वजनाची सोन्याची चैन,50,000/- किंमतीच्या 1 तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या प्रत्येकी अर्धा तोळा प्रमाणे यासोबत 5000/- रुपये किमतीचे चांदीचे दागिणे आणि 70,000/- हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरीस गेला आहे.

फिर्यादित म्हटल्याप्रमाणे,उन्हाळ्याची तीव्र दाहकता असल्याने फिर्यादी हे शनिवारी दि.13 रोजी रात्री आपल्या कुटुंबासमवेत कांदलगांव मधील त्यांच्या राहत्या घराच्या स्लॅपवर कुटुंबासमवेत झोपण्यासाठी गेले होते.यावेळी त्यांनी आपल्या घराच्या दरवाजाला बाहेरुन कुलूप लावले होते.रविवारी दि.14 रोजी सकाळी पहाटे पाच च्या सुमारास झोपेतून उठलेनंतर फिर्यादी व कुटुंबातील इतर सदस्य स्लॅपवरून खाली आले. त्यावेळी त्यांना घराच्या हॉलच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटलेला दिसला. घरामध्ये प्रवेश करून पाहीले असता बेडरूममधील लाकडी कपाट कशाचेतरी साहाय्याने उचकटलेले दिसले व त्यातील साहीत्य रुममध्ये अस्ताव्यस्त पडलेले दिसले.यावेळी कपाटामध्ये ठेवलेले फिर्यादी यांच्या आई व बहीण यांचे दागीने कपाटामध्ये मिळुन आले नाहीत.

त्यानंतर या सर्व गंभीर प्रकाराची दखल घेत इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा कसून तपास केला जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow