कोणाबद्दल काहीही बोलण्याचं लायसन फक्त अजित पवारांनाचं - हर्षवर्धन पाटलांचा पुन्हा अजित पवारांवर हल्लाबोल
आय मिरर
उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्रातील एकमेव असे नेते आहेत की त्याना महाराष्ट्रात कोणाबद्दल ही कुठेही काहीही बोलण्याचं लायसन फक्त त्यांनाच आहे असा हल्लाबोल माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्यातील शेळगाव मधील प्रचार सभेतून केला आहे.
बुधवारी दि.13 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे माळशिरसचे उमेदवार धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे हर्षवर्धन पाटील यांची प्रचार सभा पार पडली आणि या सभेमध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते.
याच सभेत हर्षवर्धन पाटलांनी लोकसभेदरम्यान व्हायरल झालेल्या आमदार दत्तात्रय भरणे यांच्या व्हिडिओची क्लिप ऐकवत लावु का आता नाना गवळीचा तो व्हिडिओ,तरंगवाडीच्या तळ्यातील व्हिडिओ म्हणतं आमदार भरणे यांना ही लक्ष केलं. तुम्ही आमचे व्हिडिओ लावता आता आम्ही लावू का तुमचे व्हिडिओ असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्याच्या हातून मोबाईल घेतला आणि आमदार दत्तात्रय भरणे यांचा लोकसभेदरम्यान वायरल झालेला तो वादग्रस्त व्हिडिओ थेट माइक वरती ऐकवला याच वेळी तरंगवाडी मधील देखील व्हिडिओ तुमचा माझ्याकडे आहे असं हर्षवर्धन पाटील यांनी ठणकावून सांगितलं शिवाय अशा उमेदवाराला आता तुम्ही मत देणार आहात का असा स्वारी हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थितांना विचारला.
इंदापुरात सुरू आहे "लाव रे तो व्हिडिओ" मिशन
गेल्या तीन चार दिवसापासून आमदार दत्तात्रय भरणे त्यांच्या प्रचार सभेमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या व्हिडिओ क्लिप लोकांना ऐकवत आहेत. आमदार म्हणून तालुक्यात "लाव रे तो व्हिडिओ" मिशन राबवलं जात आहे. ज्या ज्या ठिकाणी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत त्या त्या ठिकाणी दत्तात्रय भरणे हे हर्षवर्धन पाटील यांचे काही व्हिडिओ समाजाला ऐकवत आहेत.यामध्ये एका टेलिव्हिजन वाहिनीला हर्षवर्धन पाटील यांनी मुलाखत देतानाचा व्हिडिओ, शिवाय शिरसोडीच्या पुलाला हर्षवर्धन पाटील यांनी कसा विरोध दर्शवला यासोबतच इंदापूर शहरातील वाघ पॅलेसमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात आपल्यावरती फायनान्स चालवणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याचा खोटा आरोप लावला जात आहे आणि तो कसा याचे व्हिडिओ भरणे सतत ऐकवताना दिसत आहेत. एकूणचं आ.भरणेंकडून सध्या यंदाच्या विधानसभेमध्ये "लाव रे तो व्हिडिओ" हे मिशन राबवले जात आहे.
कालच्या शेळगांव मधील सभेतून याच मिशनला हर्षवर्धन पाटील यांनी आव्हान दिल्याचं पहायला मिळालं. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सात मे 2024 रोजी इंदापूर तालुक्यातील एका गावात भरणे यांनी एका व्यक्तीला अरेरावी केली होती.हाच व्हिडिओ आता भरणेंसाठी डोकेदुखी ठरत आहे.
जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमदार दत्तात्रय भरणे हे हर्षवर्धन पाटील यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी ते लाव रे तो व्हिडिओ हे मिशन राबवत आहेत हेच मिशन हर्षवर्धन पाटील यांकडून आता लोकसभेतील व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून हाणून पाडण्याचं प्रयत्न केला जात आहे.
What's Your Reaction?