दोन महिने फक्त नावावर प्रचार करण्यात आलेला बारामती हा देशातील एकमेव मतदारसंघ - माजी सभापती प्रवीण माने 

Mar 13, 2024 - 06:33
 0  747
दोन महिने फक्त नावावर प्रचार करण्यात आलेला बारामती हा देशातील एकमेव मतदारसंघ - माजी सभापती प्रवीण माने 

आय मिरर(देवा राखुंडे)

मागील महिन्यातच खा.सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत पक्ष कोणता ? निर्णय नाही, अंतिम चिन्ह कोणते ? निर्णय नाही असे असतांनाही उमेदवारी फायनल होऊन गेली दोन महिने फक्त नावावर प्रचार करण्यात आलेला बारामती हा देशातील एकमेव मतदारसंघ असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी केले.

नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत २५ फेब्रुवारीला इंदापुरात जुन्या कृषि उत्पन्न बाजार समितीत शेतकरी व कार्यकर्ता मेळावा पार पडलाय.त्यानंतर आता त्याच मैदानात शनिवारी २३ मार्च ला महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडणार आहे.या मेळाव्यास जेष्ठ नेते शरद पवार, खा.संजय राऊत, खा.अमोल कोल्हे,काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात,आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप यांच्यासह दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी दि.१२ मार्च रोजी इंदापूरातील शासकीय विश्रामगृहात महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिका-यांची बैठक पार पडलीय.यावेळी ते बोलत होते.

इंदापूरात पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील,कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे ,सागर मिसाळ ,आम आदमी पक्षाचे अमोल देवकाते,आण्णासाहेब पाटील,नितीन कदम,अँड.आशुतोष भोसले ,काँग्रेसचे निवास शेळके, तानाजी भोंग,रमजान बागवान, जाकीर काझी, अक्षय कोकाटे,छाया पडसळकर, रेश्मा शेख, अंकुश दोरकर यांसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दहा दिवस तालुक्यात घोंगडी बैठका… 

महाविकास आघाडीच्या शेतकरी मेळाव्याच्या दृष्टीने प्रचार व प्रसार करण्यासाठी उद्या बुधवार दि.१३ मार्च पासून दहा दिवसाचा घोंगडी बैठकीचे आयोजन केले आहे.पडस्थळ गावातून याची सुरवात होईल. यात महाविकास आघाडीतील सर्व स्थानिक नेते प्रमुख पदाधिकारी सहभागी होतील.

गुरुवारी सुप्रिया सुळे इंदापूर दौ-यावर…

गुरुवारी खा.सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्याच्या दौ-यावर असून २३ मार्च ला होणा-या महाविकास आघाडीच्या इंदापूरातील मेळाव्याच्या दृष्टीने सुळेंच्या दौ-याला महत्व प्राप्त झाले आहे. 

इंदापूरातील सर्व निवडणूका प्रवीण मानेंच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार… 

इंदापूर तालुक्यात आगामी काळात होणा-या सर्व निवडनूका पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल भिसे यांनी केली.असून स्वतः प्रवीण माने या बैठकीला उपस्थित होते.त्यामुळे आगामी काळात इंदापूरातील राजकाणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचा बारामतीतून पहिला उमेदवार जाहिर…

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी शनिवारी भोरमध्ये घोषित करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा केलीय. एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow