दादा गटाच्या तालुकाध्यक्षा पासून आम्हाला धोका,आम्हाला संरक्षण द्या ! मी जनतेचा उमेदवार कोणत्या पक्षाचा नाही - प्रवीण माने
आय मिरर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यापासून आम्हाला धोका असल्याचं प्रवीण माने यांनी म्हटलं आहे.हनुमंत कोकाटे हे मला माझ्या वडिलांना आणि कार्यकर्त्यांना तालुक्यात फिरू देणार नाही अशी जाहीर वक्तव्य करत आहेत. हनुमंत कोकाटे धमक्या देताना शेजारी बसून विद्यमान आमदार हे पाहत असतील तर यांच्या पायाखालची वाळू घसरली.त्यामुळे माझ्या सह माझ्या कार्यकर्त्यांना धोका असल्याचं प्रवीण माने यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
प्रवीण माने यांनी आज बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी सोनाई पॅलेस येथे पत्रकार परिषद ही मागणी केली आहे.
माने यांनी पोलीस प्रशासनाकडे संरक्षण पुरवण्याची मागणी देखील केली आहे.इंदापूर तालुक्यात दडपशाही सुरु आहे.सामन्या लोकांचा गळा दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे.अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष ज्यांकडे सत्ता आहे ते प्रतिस्पर्धी उमेदवाराला तालुक्यात फिरु देणार नाहीत असं म्हणत असतील तर आम्हाला तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांपासून धोका आहे.तुम्ही मेरीटरवर मत मागा, मतदार राजा आहे. तो योग्य माणसाला मत देईल.संविधानिक खुर्ची धमकी देण्यासाठी नसते तर सेवा करण्यासाठी असते.सत्ताधारी पक्षाकडून धमकी मिळत असेल तर मी त्यांचा निषेध नोंदवतो असं माने यांनी म्हटले आहे.
परिवर्तन विकास आघाडीला लोकांचा पाठींबा मिळत आहे.आज मातंग एकता आंदोलन संघटनेच्या पदाधिका-यांनी पाठींबा दर्शवला आहे.यांसह काँग्रेसचे प्रदेश सरचिटनीस तानाजी भोंग आणि इतर काहींनी पाठींबा दर्शवला आहे.ही निवडणूक सामान्य नागरिकांनी हातात घेतली आहे.
परिवर्तन विकास आघाडीचा जन्म 23 आँक्टोंबर रोजी झाला,नांव ठेवण्याचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर ला झाला.अनेक संघटनांच्या नेत्यांनी आम्हाला पाठींबा दिला आहे.इंदापूर तालुक्यात दडपशाही सुरु आहे.सामान्य लोकांचा गळा दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे.चिन्ह मिळाल्यापासून आम्हाला त्रास दिला.एक पक्ष एकच नेते एकच तारीख एकच वेळ पाचशे फुटावर दोन सभा घेऊ शकतात का ? ही जनतेची मुस्कटदाबी आहे असं माने म्हणाले.
मी जनतेचा उमेदवार आहे कोणत्या पक्षाचा नाही…
काल तर हर्षवर्धन पाटलांनी काय सांगितलं की आम्ही बी टीम आहोत.मी याचे खंडन करतो,मी जनतेचा उमेदवार आहे कोणत्या पक्षाचा उमेदवार नाही. जनता ठरवेल काय करायचे.वीस वर्षात काय केलं जनतेला सांगा.जातिवाद निर्माण करण्यास कालपासून सुरवात केली आहे.
दमदाटी,अफवा पसरवणे मला पोलिसांना हात जोडून विनंती करायची आहे आम्हाला संरक्षण द्या.आम्हाला तालुक्यातील वातावरण खराब करायचे नाही नाही,म्हणून लेखी तक्रार केली नाही.संवेदनशील बुथ आहेत,बुथ कॅप्चरिंग होऊ शकतात, प्रशासनाकडे लेखी यादी देणार आहोत असं ही माने म्हणाले.
मी जनतेच्या दरबारात गेलो आहे,जनतेला अपिल केले आहे.जे शब्द दिले आहेत,आश्वासने दिली आहेत ती येणा-या पाच वर्षात जनतेने आशिर्वाद दिला तर सोडवण्यासाठी प्रयत्न करणार.कितीही अडवणूक केली तर १८ तारखेला सांगता सभा होणार.किटली चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करा असं आवाहन मी जनतेला करतो.
सोनाईचा आणि अनुदानाचा संबंध नाही…
राज्यात देशात दूध दरात चढ उतार झाले तर याचे नियंत्रण हे केंद्र सरकारच्या हातात असते. अशा वेळी सरकार दूध स्विकारते.खरेदी आणि विक्रीतील तफावत पाहुन अनुदान जाहिर केले. राज्यात प्रत्येक संकलन केंद्रावर बँक खाते नंबर आणि के वाय सी शासनाकडे नोंदवावी लागते. सरकार खात्यावर रक्कम जमा करते.यात सोनाईचा काडीचा संबंध नाही.त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो.दूध डेअरी काढा, कामगार कामाला ठेवा आम्ही स्वागत करु.
दोन्ही उमेदवारांकडून पुड्या सोडण्याचं काम - मयूरसिंह पाटील
भर सभेत लोकात संभ्रम निर्माण कसाल तर त्यांचा मी धिक्कार करतो निषेध करतो.पुरावा नसताना असं विधान केले. काही पुड्या सोडण्याचं काम दोन्ही उमेदवार करत आहेत.हा साडेतीन लाख मतदारांचा हा अपमान आहे.यातून तुम्हाला एकही मत वाढणार नाही. पुढील चार दिवसात अशा अफवा सोडण्याचे काम सुरु आहे.
खरी लढत दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने यांच्या असून सतत कमी लेखण्याच्या वृत्तीमुळे हर्षवर्धन पाटील हे तिस-या क्रमांकावर गेले आहेत.तर आ.भरणे हे दुस-या क्रमांकावर आहेत.आजी माजी आमदारांना तिसरा माणूस सहन होत नाही, प्रशासानाचा गैरवापर तालुक्यात झाला आहे.
प्रवीण माने यांनी किटली चिन्ह प्राधान्याने मागितले होते तर त्यावेळी दुस-या उपलब्ध नसलेल्या उमेदवाराला त्याचा प्रतिनिधी नसताना हे चिन्ह देण्याचा प्रयत्न केला.
चिठ्ठ्या टाकल्या पण शेवटी चिट्टीत ही माने यांचं नांव निघाले. शेवटचा पर्याय म्हणून आमचे बॅनर फाडले. दोन्ही उमेदवार स्वत:च्या चेह-यावर मत मागत नाहीत. एकाने पवार साहेबांना पुढे केलेय दुस-याने अजित पवारांना पुढे केले आहे.स्वत:चा चेहरा वापरुन मत मागण्याच्या हिंमत तुम्ही करत नाही. तुम्ही तुमच्या चेह-यावर मत मागा ना असा सवाल मयूरसिंह पाटील यांनी केला.
What's Your Reaction?