इंदापूरच्या तिरंगी लढतीत कोण उधळणार विजयाचा गुलाल ? उद्या होणार फैसला
आय मिरर (देवा राखुंडे)
पुण्याच्या इंदापूर विधानसभेकडे राज्यभरातून लक्ष लागले असून 2024 चा विजयी गुलाल कोण उळणार याकडे आत्तापासूनचं लक्ष लागले आहे.
भरणे पाटील आणि माने यांच्यात होत असलेल्या अत्यंत चुरशीच्या या लढतीत दत्ता भरणे विजयाची हॅट्रीक करताहेत की हर्षवर्धन पाटील दोन्ही पराभवाचा वचपा काढणार ? की युवा चेहरा असलेले प्रवीण माने पहिल्याचं लढतीत थेट विजयाचं मैदान मारणार याचा फैसला उद्या होणार आहे.
इंदापूर विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती,आता प्रतिक्षा आहे ती निकालाची. उद्या शनिवारी 23 नोव्हेंबर इंदापूरकरांनी कोणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे.
इंदापूर विधानसभेची 2024 निवडणूक अत्यंत चुरशीची पहायला मिळाली. प्रामुख्याने तिरंगी झालेल्या निवडणूकीत युवा चेहरा असणारे प्रवीण माने कोणाला झटका देणार ? की पहिल्याचं खेळीत विजयाचं मैदान मारणार याची उत्सुकता सर्वांना असताना माने फॅक्टर धनगर समाजाचे नेते असलेल्या दत्तात्रय भरणे यांवर परिणाम करतो की मराठा समाजाचे नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या मतांचं विभाजन करतो यावर या दोन्ही उमेदवारांचे भविष्य अवलंबून असल्याने या निवडणूकीला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे.
2014 आणि 2019 च्या पराभवाचा बदला घेण्यासाठी हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मोठी ताकद लावल्याचे या निवडणूकीत पहायला मिळाले. काही नेते हर्षवर्धन पाटलांना सोडून गेले पण कार्यकर्ते हलले नाहीत जनता आमच्या सोबत असा दावा पाटील समर्थकांकडून नेहमी करण्यात आला,आता खरचं तसं घडलयं का हे उद्या समजेलचं.पण यंदाच्या निवडणूकीत हर्षवर्धन पाटलांच्या हाती शरद पवारांची तुतारी असल्याने आणि अवघ्या पवार कुटुंबाने पाटलांचा प्रचार केल्यानं त्यांच्या विजयचा मार्ग सुखर आहे असा अंदाज राजकीय वर्तुळात लावला जातोय.
तर दुसरीकडे 2014 पासून सलग दोन विजय मिळवलेल्या दत्तात्रत भरणे यांनी देखील विजयाची हॅट्रीक साधण्यासाठी जाहीर सभांपेक्षा गाव टु गांव आणि उंबरा टु उंबरा प्रचार केल्याचं पहायला मिळालं.2014 पासून भरणेंच्या हाती तालुक्याची सुत्र असून 2019 ते 24 या कालावधीत आपण 6 हजार कोटी रुपयाचा विकास निधी तालुक्यात आणला आणि याच विकासकामाच्या जोरावर जनता मला निवडून देईल असा विश्वास आ.भरणे यांना आहे. त्यामुळे आता इंदापूरात विजयाचा गुलाल नेमकं कोण खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?