भिगवण पोलिसांनी सिनेस्टाईलने पकडला चोरीच्या दुचाकीसह आरोपी,अनेक गुन्ह्यांचं उलघडणार कोडं

Oct 11, 2023 - 15:50
Oct 11, 2023 - 19:26
 0  3801
भिगवण पोलिसांनी सिनेस्टाईलने पकडला चोरीच्या दुचाकीसह आरोपी,अनेक गुन्ह्यांचं उलघडणार कोडं

आय मिरर (विजयकुमार गायकवाड)

भिगवणच्या मदनवाडी चौकातून दुचाकी चोरी करुन पळ काढणाऱ्या आरोपीला भिगवण पोलिसांनी पाठलाग करत सिनेस्टाईलने पकडले आहे. भिगवण पोलिसांनी घटना घडताच अवघ्या नऊ मिनिटात या आरोपीच्या मुस्क्या आवळल्याने भिगवण पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या आरोपीकडून आणखीन मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता भिगवन पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी वर्तविली आहे.

सदर आरोपीने भिगवण मधील मदनवाडी चौकातील होंडा कंपनीची शाईन दुचाकी क्रमांक MH 42 S 7127 ही गाडी चोरी केली आणि पळ काढला यानंतर दुचाकी मालक सुनील हनुमंत कुंभार रा मदनवाडी ता. इंदापूर यांनी भिगवण पोलीस ठाण्यात आपली दुचाकी चोरीला गेल्याची खबर दिली. यावरून तात्काळ ठाणे अंमलदार महेश उगले यांनी बीट मार्शल व हायवे पेट्रोलिंग आणि ट्राफिक स्टाफ ला याची माहिती कळवली आणि शोध सुरु झाला.

अज्ञात चोरटा हा सदरची चोरी केलेली दुचाकी घेऊन सोलापूरच्या दिशेने गेला असल्याची माहिती पोलीसांना मिळताच पुणे सोलापूर महामार्गावर विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान सदरील आरोपीस बिल्ट कंपनी समोर सिनेस्टाईलने पाठलाग करुन पकडण्यात पोलिसांना यश आले. 

यावेळी हायवे पेट्रोलिंग स्टाफ ने डाळज 2 येथे कंटेनर आडवा लावून पूर्णपणे वाहतुक थांबविले होती, तसेच बीट मार्शल यांनी सदर गाडीचा मोटारसायकल वरती सतत पाठलाग ठेवला होता. त्यामुळे दुचाकी घेऊन पसार होण्यात हा भामटा अयशस्वी ठरला. पोलीस आता त्याच्याकडे कसून चौकशी करीत असून भिगवण पोलिसांनी या आरोपीचे नाव गुप्त ठेवले असून त्याच्या अन्यसाथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पो.निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार महेश उगले करीत आहेत.

सदरची कामगिरी अंकित गोयल पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे , उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक, रुपेश कदम पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलिस अंमलदार महेश उगले,गणेश करचे,सचिन पवार, रणजित मुळीक ,मंदार शिंदे ,अजित सरडे, आप्पा भांडवलकर ,ट्राफिक वर्डन कसबे ,धापटे तसेच होमगार्ड कुंभार, सुतार, वाघमारे, यांनी केलेली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow