श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप-अण्णासाहेब शेलार शरद पवारांच्या भेटीला ! पवार गटाकडून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक

Sep 21, 2024 - 12:32
Sep 21, 2024 - 12:43
 0  200
श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप-अण्णासाहेब शेलार शरद पवारांच्या भेटीला ! पवार गटाकडून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक

आय मिरर

कर्मयोगी कुंडलिकराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप यांनी शरद पवारांची बारामतीत भेट घेतली आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे ही भेट झाली. श्रीगोंदा मधून राहुल जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याची इच्छुक आहेत.

2014 ला राष्ट्रवादीकडून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून ते आमदार राहिले आहेत.त्यांच्या सोबतच बेलवंडी येथील अण्णासाहेब शेलार यांनीही शरद पवार गटाकडून तिकिट मागितले आहे. त्यामुळे शरद पवार नेमके कुणाला तिकिट देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर असून माळेगाव येथे शिवनगर विद्या प्रसारक मंडळ या इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांनी भेट दिली असून त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बैठक ही पार पडली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow