पिडीसीसी बँकेच्या मॅनेजर वरती निलंबनाची कारवाई ; रोहित पवारांनी केले होते आरोप

May 11, 2024 - 10:20
May 11, 2024 - 10:24
 0  910
पिडीसीसी बँकेच्या मॅनेजर वरती निलंबनाची कारवाई ; रोहित पवारांनी केले होते आरोप

आय मिरर

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हे शाखेच्या मॅनेजर वरती निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली आहे.बारामती लोकसभेच्या मतदानाच्या अगोदरच्या एक दिवस अगोदर रात्री बँक सुरू ठेवल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियात शेअर केला होता. पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी बँक मॅनेजर वरती आरोप केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगानं याची दखल घेत बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर बँकेच्या आत 40 ते 50 कर्मचारी असल्याचं समोर आल्यानंतर ही निलंबनाची कारवाई केली आहे.

बारामती मतदारसंघात असलेल्या भोर तालुक्यातील वेल्हे येथील बँकेची शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. 

आयोगाच्या भरारी पथकाने यासंदर्भातील तक्रारीनंतर त्याच रात्री बँकेच्या शाखेत जाऊन पाहणी केली असता, बँकेत ४० ते ५० जण असल्याचे आढळले होते.त्या अनुषंगाने बँकेतील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. त्यात काही लोक शाखा व्यस्थापकाच्या केबिनमध्ये आत-बाहेर करत असल्याचे आढळले.

त्याची दखल घेऊन आयोगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे शाखा आणि बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोषी आढळल्याने आयोगाने व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow