इंदापूर बाजार समितीत ड्रॅगन फ्रुटने खाल्ला 201 चा भाव
आय मिरर
इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत ड्रॅगन फ्रुट प्रति किलोला 201 रुपयापर्यंत उच्चांकी दर मिळालाय.तर 255 रुपये इतक्या उच्चांकी दराने डाळींबाची विक्री झालीय. शेतमालाला उच्चांकी दर मिळल्याने शेतकऱ्याने समाधान व्यक्त केलेय.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघड लिलाव पद्धतीने शेतमालाची विक्री होते. यात पेरु प्रति किलो रु. 75/- पर्यंत उच्चांकी दराने विक्री झाली.तर कांदा प्रति क्विंटल रु. 5100/- पर्यंत उचांकी दराने विक्री झाली. यासोबत मका प्रति क्विंटल रु. 3500/- पर्यंत उच्चांकी दराने विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहीत मोहोळकर व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि बाजार समितीच्या संचालक मंडळांने दिली.
What's Your Reaction?