एनडीए परिसरात सापडला बाँम्ब ; पुण्यात खळबळ

May 11, 2024 - 10:05
 0  979
एनडीए परिसरात सापडला बाँम्ब ; पुण्यात खळबळ

आय मिरर

पुण्यातील एनडीए परिसरात बॉम्ब सापडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान BDDS पथकाने हा बॉम्ब निकामी केला आहे. असे असले तरी सुरुवातीला याची माहिती सर्वत्र पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या परिसरात कमळा देवी मंदिरामागे एका पुलाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना तेथे हॅन्ड ग्रॅनाईट आढळल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक कदम, पोलीस उपनिरीक्षक अनुसे, एटीसी पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

पुणे पोलिसांनी BDDS पथकाला पाचारण केले. सदरची वस्तू धोकादायक असल्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 यांच्या परवानगीने हे ग्रेनाईट नष्ट केले आहे. याबाबतची माहिती उत्तम नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow