बारामतीच्या जैनकवाडीत एक-दोन नाही तर तब्बल 50 एकरावर भहरलं सूर्यफूल

Sep 25, 2024 - 16:18
Sep 25, 2024 - 17:04
 0  183
बारामतीच्या जैनकवाडीत एक-दोन नाही तर तब्बल 50 एकरावर भहरलं सूर्यफूल

आय मिरर

बारामतीच्या जैनकवाडीत सध्या सुर्यफुलाचं पिक बहरलयं. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाकडून बारामती तालुक्यातील जैनकवाडीत या वर्षी सूर्यफूल पीक प्रकल्प राबवला जातोय.या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांना निविष्टा व बियाने वाटप करण्यात आले आलेत. सध्यस्थिती ला पीक जोमदार आले असून शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल असे जैनकवाडी गावचे प्रगतशील शेतकरी महादेव शिंदे यांनी सांगितलेय. 

तर कृषि विभागा मार्फत सूर्यफूल मार्गदर्शन सभा, शेतीशाळा चे आयोजन करून मार्गदर्शन व सल्ला देण्यात आल्याचे कृषि पर्यवेक्षक आनंद घोळवे यांनी सांगितलेय.

सध्या खाद्यतेलाची भाव गगनाला भिडलेत. तेलबियाचे उत्पादनही कमी झालंय.त्यामुळे तेलबिया पिकांकडे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना स्वतःचं तेल उत्पादन करता यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून हा प्रकल्प राबवला जातोय.

यावर्षी पाऊस काळ चांगला असल्याने सूर्यफूल पीक देखील जोमाने भहरलयं. यंदा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाल्यास पुढील वर्षी शेतकरी व्यापक प्रमाणावर तेलबिया पिकाची लागवड करतील असा विश्वास शासनाला आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow