रविवारी इंदापूरात मोफत हृदयविकार तपासणी शिबिराचे आयोजन ; या शस्त्रक्रिया ही करता येणार मोफत
आय मिरर
देशपांडे हॉस्पिटल बारामती आणि इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूरच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर व इंदापूर परिसरातील सर्व नागरिकांसाठी मोफत हृदयविकार तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
रविवारी दि.29 आँक्टोंबर रोजी इंदापूर मध्ये डॉक्टर नीतू मांडके आयएमए हॉल अकलूज पुणे लिंक रोड, व्हीपी कॉलेज शेजारी इंदापूर या ठिकाणी हे शिबीर पार पडणार असुन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 7972086715 यावर रुग्ण संपर्क साधू शकतात.
हे शिबिर बारामतीतील सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ. अशोक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जाणार असून हे शिबिर संपूर्णतः मोफत आहे. तसेच इथे होणाऱ्या तपासणीमध्ये अँजिओप्लास्टी, बायपास उपचारासाठी आर्थिक व दुर्बल घटकातील गरजूंसाठी विविध योजनांच्या अंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत.
तसेच इतर सर्वांसाठी विविध उपचार व सवलती येथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अतिशय सवलतीच्या दरामध्ये अँजिओग्राफी सुद्धा केली जाणार आहे. येताना सर्वांनी पूर्व तपासणीचे रिपोर्ट व औषधे घेऊन रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत या शिबिरामध्ये उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?