ब्रेकिंग || इंदापूरच्या बाह्य वळणावर भीषण अपघात - भरधाव ट्रकने एकास चिरडले,संतप्त जमावाने ट्रक पेटवला

Oct 24, 2023 - 13:59
Oct 24, 2023 - 14:05
 0  5785
ब्रेकिंग || इंदापूरच्या बाह्य वळणावर भीषण अपघात - भरधाव ट्रकने एकास चिरडले,संतप्त जमावाने ट्रक पेटवला

आय मिरर

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराच्या बाह्यवळणावर भीषण अपघात झालाय. एका भरधाव ट्रकने एका दुचाकी स्वरास चिरडल्याची घटना घडली आहे. यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दशरथ मारुती चोरमले असं मयत दुचाकीस्वाराचे नांव असून ते इंदापूर नजीक असणा-या काळके वस्ती गलांडवाडी नंबर एक येथील रहिवासी आहेत.

दुर्गेश्वरी हाॅटेल समोर हा अपघात घडला आहे.असून संतप्त जमावाने हा ट्रक पेटवून दिला आहे.MH 32 AJ 9273 या क्रमांकाचा ट्रक सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघाला होता.या दरम्यान MH 42 C 5604 या दुचाकीवरील दशरथ मारुती चोरमले हे दूध विक्री करुन घरी निघाले असता त्यांना या ट्रकने चिरडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला असून या दरम्यान पेटवलेला ट्रक विझवण्याचा प्रयत्न करताना इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन नरळे यांना किरकोळ भाजल्याची माहिती मिळत आहे.

इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केलाय. इंदापूर नगर परिषदेच्या अग्निशामकच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली आहे.दरम्यान रुग्णवाहिका चालक नितीन खिलारे यांनी ही या कामी मदत केली.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow