दौंडच्या खडकीत पिक अपचा अपघात,अपघातात पिक अपचा चक्काचूर

Sep 14, 2024 - 10:38
Sep 14, 2024 - 10:54
 0  984
दौंडच्या खडकीत पिक अपचा अपघात,अपघातात पिक अपचा चक्काचूर

आय मिरर

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील खडकीत मालवाहतूक पिक अप चा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पिक अप चा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. पिक अप मध्ये अडकलेल्या वाहन चालकाला नागरिकांच्या प्रसंगावधानाने बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दि.13 सप्टेंबर रोजी रात्री माल वाहतुक करणा-या पिक अप चालकाने पुढे निघालेल्या ट्रक ला पाठीमागून धडक देऊन हा अपघात झाला. यातील पुढे धावणारे ट्रक हे वाहन घटनास्थळापासून निघून गेले. या अपघातात पिक अपचे मोठे नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांनी पिक अप मध्ये अडकलेल्या चालकास मोठे प्रयत्न करुन बाहेर काढले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow