दुचाकीला अचानक साप आडवा आला अन् अपघात झाला,बलेनो कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक ! दोन जन गंभीर जखमी 

May 26, 2024 - 15:47
 0  44

आय मिरर

पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या नीरा मोरगाव मार्गावर नीरा डावा कालव्याच्या जवळ बलेनो कार आणि स्प्लेंडर मोटर सायकलची समोरासमोर धडक झालीय.दुचाकीला अचानक साप आडवा आला आणि दुचाकीस्वार घाबरल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतयं.यात दोन जण गंभीर जखमी झालेत.जखमींना लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आलंय. 

याबाबत प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण चौधरी राहणार नगर ( पाथर्डी) हे आपल्या कुटुंबीयांसह बलेनो कार क्रमांक एम एच 16 CQ 3949 मधून नीराकडे येथ होते.याच वेळी नारायण मलगुंडे व त्यांचे मित्र करे हे मोटार सायकल क्रमांक एम.एच 12 बी डब्ल्यू 6049 वरून नीरेकडून मोरगावला चालले होते.नीरा डावा कालव्याच्या जवळ असलेल्या वळणावर रस्त्यावर मध्यभागी एक साप आला.त्यामुळे बीचकलेला मोटरसायकलस्वार कारला जावून धडाका व कार रस्त्याच्या कडेला गटारात गेली.या अपघातात मोटारसायकलवरील दोघे गंभीर जखमी झालेत.तर कारचे मोठ नुकसान झालंय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow