'एक मराठा लाख मराठा' जालन्यातील घटनेचे पुण्याच्या इंदापुरात पडसाद ; निषेध मोर्चासह केला रास्ता रोको
आय मिरर
पुणे जिल्ह्याचा इंदापूर मध्ये जालना घटनेच्या निषेधार्थ सोमवारी दि.०४ सप्टेंबर रोजी इंदापूरात बंद पाळण्यात आला.यासोबत इंदापूर शहरातून सकल मराठा समाजाकडून जाहीर निषेध मोर्चा देखील काढण्यात आला असून इंदापूर नगरपरिषद प्रांगणातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पन केल्यानंतर इंदापूर पंचायत समिती समोर शेकडो समाज बांधवांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन करत झालेल्या घटनेवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करावी. लाठीचार्ज सारखा हल्ला करणाचा आदेश देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची पंधरा दिवसाच्या आत निलंबन करावे. लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण लागू करावं अशा मागणीचं लेखी निवेदन इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना देण्यात आले आहे.
या आंदोलनात शेकडो समाज बांधव हे सहभागी झाले होते.अनेकांनी यावेळी मनोगते व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी एक मराठा लाख मराठा,कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही,दडपशाही सरकारचे करायचे काय खाली मुंड वर पाय अशी घोषणाबाजी करण्यात आली.
जालना या ठिकाणी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असताना पुणे जिल्ह्याच्या इंदापूर मध्ये मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. इंदापूर शहरात येणाऱ्या दोन्ही मार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. आंदोलनाच्या ठिकाणी देखील पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. स्वत: या सर्व परिस्थितीवर तहसिलदार श्रीकांत पाटील, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार बारकाईने लक्ष ठेऊन होते.
What's Your Reaction?