इंदापूरात मराठा तरुणांकडून मंत्री मुंडेंच्या राजीनाम्यासह आरोपींच्या अटकेची मागणी,वाचा सविस्तर
आय मिरर
बीड आणि परभणीतील घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असताना पुण्याच्या इंदापूर मध्ये देखील सकल मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
गुरुवारी जय भवानी जय शिवाजी अशी जोरदार घोषणाबाजी करत या शेकडो तरुनांनी थेट इंदापूर तहसिल कार्यालय गाठत आपल्या मागणीचे लेखी निवेदन तहसलीदार बनसोडे यांना दिले आहे.
परभणी आणि बीड मधील घटना अत्यंत वेदणादायी आणि क्रुर आहेत. बीड मधील मस्साजोग येथील कर्तव्यदक्ष सरपंच आणि मराठा चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करुन खून करण्यात आला.ही घटना निंदनीय असून या खून प्रकरणातील मुख्य आरोपी,सुत्रधार त्यांचे सहकारी यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
तर याच प्रकरणी राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांवर देखील विविध आरोप केले जात असल्याने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा तर सरकारने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी मराठा तरुणांनी केली आहे.
तर परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी हे संविधानिक पध्दतीने चळवळ करत असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.पोलिस संरक्षणात पोलिस कोठडीत त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप मराठा तरुणांनी केला असून सदर प्रकरणाची सक्षम अधिका-याकडून सत्य व पारदर्शी चौकशी करुन सर्व दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी.
बीड आणि परभणी प्रकरणाचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मराठा तरुणांनी केली आहे.
आमदार धस यांच्या भेटीसाठी इंदापूरातून मराठा तरुण रवाना
भाजपाचे आमदार सुरेश धस सातत्याने बीड प्रकरणाची बाजू माध्यमांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत आहे. शासन दरबारी ही सुरेश धस यांनी या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक बारकावे नजरेस आनत देशमुळ यांना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला आहे. सुरेश धस यांच्या माध्यमातून हे प्रकरणी न्याय मिळावा या करीता धस यांना आपला पाठींबा दर्शवण्यासाठी काही मराठा तरुण हे धस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.
What's Your Reaction?