इंदापूरच्या गागरगावात भर दिवसा घरफोडी,आठ लाख 90 हजार किमतीचा ऐवज लंपास
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील गागरगाव मध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास भर दिवसा घरपोडी झाली आहे. यात अज्ञात चोरट्याने दोन घरातून मिळून तब्बल आठ लाख 90 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केलाय. यात सहा लाख 90 हजार रुपये किमतीचे साडेअकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 2 लाख रुपये रोख रकमेचा समावेश आहे.
या संदर्भात नवनाथ अर्जुन कचरे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून इंदापूर पोलिसांकडून या अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जातोय.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, शुक्रवारी दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 08 वाजताचे सुमारास नवनाथ कचरे नेहमीप्रमाणे एस. बी. पाटील विदयालय गागरगव येथील कॅन्टीनमध्ये जाणेसाठी निघाले. याच वेळी त्यांच्या पत्नी उषा या देखील कारखाना चौक येथील, कापड दुकानात जाणेसाठी निघाल्या.यावेळी उषा कचरे यांनी दरवाज्याला कुलूप लावुन कुलपाची चावी नेहमीप्रमाणे खिडकीमध्ये ठेवुन दिली होती. नवनाथ कचरे यांचा दुसरा भाऊ भावजय हे शेतात गेले शिवाय आई दुपारी दवाखान्यात गेली होती. यामुळे सहाजिकच घरी कोणीही नव्हते.
साधारण दुपारी 4 वाजताचे सुमारास नवनाथ कचरे यांच्या आई दवाखान्यातून घरी आल्यानंतर त्यांना घराचे दरवाजे कोणीतरी तोडले असल्याचे दिसले यावर त्यांनी मुलगा नवनाथ यांना फोन केला. दरवाजाची कड़ी कोयंडा कोणीतरी तोडुन घरामधील सामानाची चोरी केलेली आहे व कपाटाचे दोन सर्व साहीत्य सामान अस्ताव्यस्त पडलेले आहे तु लवकर घरी ये अशी सूचना केली. नवनाथ कचरे यांनी घरी जाऊन पाणी केले असता संपूर्ण प्रकार निदर्शनास आला आणि अज्ञाताने आपल्या घरी चोरी केल्याची त्यांची खात्री पटल्यानंतर त्यांनी याबाबतीत इंदापूर पोलिसांना कळवले.
या संदर्भात इंदापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जातोय.
What's Your Reaction?