बिग ब्रेकिंग | नीरा येथे विदेशी मद्यासह २१ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
आय मिरर
पुरंदर तालुक्यातील नीरा गावच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत १३ लाख ८२ हजार ४०० रूपये किंमतीच्या विदेशी मद्यासह एकूण २१ लाख ६९ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नीरा- लोणंद मार्गावर नीरा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाजवळ वाहनांच्या तपासणीदरम्यान ही कारवाई करण्यात आलीय.
उत्पादन शुल्क विभागामार्फत अशा प्रकारची कारवाई करण्याची पुरंदर तालुक्यातील आठवड्याभरातील ही दुसरी घटना असून आठ दिवसांपूर्वी सासवड येथे अशी कारवाई करण्यात आली होती.
अशोक लेलॅण्ड कंपनीचे बडा दोस्त मॉडेलच्या चारचाकी टेम्पो वाहन क्र. एमएच ०३- सीव्ही ९४६८ मध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १८० मि.ली. क्षमतेच्या ७ हजार ६८० बाटल्या असलेली १६० खोकी जप्त करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आलीय. त्यांविरिध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्हि.एम. माने, जवान पी.टी. कदम, एस.एस.पोंधे, ए.आर. थोरात, एस.सी.भाट, आर. टी. तारळकर, शशांक झिंगळे व महिला जवान यु.आर. वारे तसेच वाहन चालक ए. आर. दळवी यांनी सहभाग घेतला असून,या गुन्हयांचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील हे करीत आहेत.
What's Your Reaction?