दादांच्या नेतृत्वातील या संस्थेला खा.सुळेंनी दिली भेट पण अध्यक्षांसह संचालक मंडळाने भेटणं टाळलं
आय मिरर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत सभागृहात कारखाना प्रशासन आणि शेतकऱ्यांशी संवाद साधलाय.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून गाळप होणाऱ्या उसाला प्रति टनास पहिली उचल 2800 जाहीर करण्यात आली आहे.मात्र यावरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ही भेट दिली आहे. मात्र यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ उपस्थित नव्हत.
सुप्रिया सुळे यांनी कारखाना प्रशासन आणि शेतकरी यांसोबत चर्चा केली. एवढी कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी कारखान्याने 2,800 रुपये पहिली उचल जी दिले आहे ती कशी योग्य आहे आणि बरोबर आहे हे सुळेंना पटवून सांगितलं.या नंतर खा सुप्रिया सुळे यांनी माध्यमाला प्रतिक्रिया दिली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ उपस्थित न राहिल्याने सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मी आज कारखाना कार्यस्थळावर आले होते. आजच मी कारखाना व्यवस्थापनाला पत्र लिहिणार आहे. ज्या दिवशी कारखान्याचे चेअरमन आणि बोर्डाला वेळ असेल ते म्हणतील त्यांच्याच सोयीने आम्ही पुन्हा या ठिकाणी परत येऊ.. आजच्या बैठकीत कारखान्याचे चेअरमन आणि कारखाना बोर्ड नव्हते सहकाराच्या चळवळीत चेअरमन आणि बोर्ड याचा खूप मोठा रोल असतो ,असं सुळे यांनी म्हटले आहे..
हे सरकार मोठं गमतीशीर सुप्रिया सुळे यांचा साखर निर्यातीवरून केंद्रासह राज्यावर हल्लाबोल...
एम एस पी चा खूप मोठा मुद्दा आहे याशिवाय साखर निर्यात व्हावी ही गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे. शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून कांदा निर्यात करू नका अशी मागणी करतात तरी देखील कांदा निर्यात होतो. साखर कारखानदार आणि शेतकरी म्हणतात साखर निर्यात करायला परवानगी द्या पण त्यांना मिळत नाही हे सरकार मोठं गमतीशीर आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार सह राज्य सरकार वरती निशाणा साधला आहे.. जो मागत नाही त्याला मिळतंय आणि जो मागतोय त्याला मिळत नाही त्यामुळे हे सर्व गमतीशीर आहे असं सुळे यांनी म्हटल आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात पाण्याच खूप मोठा प्रदूषण होत आहे,त्याला अनेक जण कारणीभूत आहेत. पण कारखान्यांमधून होणार प्रदूषण मग उजनीच प्रदूषण असो. किंवा बारामती दौंड भोर या सर्व भागात होणारा प्रदूषण असेल. यासाठी सर्वच कारखान्यांनी मिळून एकत्रित मार्ग काढला पाहिजे.
देवेंद्र फडणवीस राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत त्यांच्या एका भाषणात मी पाहिलं होतं आम्ही सातबारा कोरा करू कर्जमाफी करू असे ते बोलले होते. भारतीय जनता पक्षाची ती टॅग लाईन आहे याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे.
दुधाला भाव मिळत नाही त्यामुळे अनेक आव्हान आहेत मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत अनेक आव्हान शेतकऱ्यांच्या पुढे आहेत त्यामुळे हा विषय सरकारने संवेदनशील पणे घ्यावा.
वाल्मीक कराडच्या विषयाच्या बाबतीत ज्या पद्धतीने खून झाला आहे त्या मुलीचे अश्रू अनावर होत आहेत. तीस दिवस झाले बीड आणि परभणीच्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत एवढं मोठं मतदान करून या महाराष्ट्रातील जनतेने या सरकारला निवडून दिला आहे ज्यांनी त्यांना त्या जागेवर बसवला आहे त्या मायबाप जनतेला न्याय भेटावा असं सुळे यांनी म्हटलं आहे.
बीड परभणीच्या घटनेत राजकारण नको - सुप्रिया सुळे
विरोधक म्हणून विषय नाही हा माणुसकीचा विषय आहे बीड आणि परभणी दोन्ही घटनेत कोणीही राजकारण आणू नये. राज्यात प्रचंड अस्वस्थता आहे. ज्या पद्धतीने दोन्ही हत्या झाल्या याचे उत्तर द्यावा लागेल. फायनान्शिअल फ्रॉड किती आहे. सुरेश धस बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर सोळंकी दमानिया या सर्वांच्या कडून जी माहिती येत आहे त्याचं काय होतं चैनल वर बातमी होते दुसऱ्या दिवशी आले होतात मग पहिल्या दिवशी जो आरोप झाला त्याचे उत्तर महाराष्ट्राला कधी मिळणार. माझा आग्रह आहे यामध्ये राजकारण आणू नये.
कार्पोरेशनच्या निवडणुका आम्ही एकत्र असताना वेगळेच लढत होतो. मागच्या निवडणुका ही वेगळ्याच लढलो होतो त्याच्यात नवीन काय. हे कार्यकर्त्यांच इलेक्शन आहे. सगळेच जण सर्वच निवडणुका आपल्या सोयीप्रमाणे लढायला लागलेत तर मग कार्यकर्त्यांनी काय सतरंज्या उचलायच्या का? त्यांना कधी न्याय मिळणार त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
आगामी काळात माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक होणार आहेत यावर बोलताना सुळे म्हणाले की,सहकारी सर्व काही ठरवतील..मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकांनी मला निवडून दिला आहे जे लोकांची नागरिकांची शेतकऱ्यांची भावना असेल
तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे तुम्ही बघताय सुरेश धस असतील बजरंग सोनवणे असतील सोळंकी संदीप क्षीरसागर अंजली दमानिया या सर्वांचीच मागणी आहे. मला वैयक्तिक काही बोलायचं नाही पण काही नैतिकता राहिली आहे की नाही या महाराष्ट्रात आणि राजकारणात. नैतिकतेने या सरकारने निर्णय घ्यावा. माझी सातत्याने ही मागणी आहे.
What's Your Reaction?