Big Breaking | पाणी आणण्यासाठी गेलेली मुलगी विहिरीत बुडाली,इंदापूर तालुक्यातील राजवडी पाटीवरील दुर्घटना

Jun 24, 2024 - 13:11
Jun 24, 2024 - 14:31
 0  2891
Big Breaking | पाणी आणण्यासाठी गेलेली मुलगी विहिरीत बुडाली,इंदापूर तालुक्यातील राजवडी पाटीवरील दुर्घटना

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील राजवडी पाटी येथे पंधरा वर्षीय मुलगी विहिरीत पाय घसरुन बुडाली गेली यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.सारिका पिराजी शिंदे असं या मुलीचं नांव असून आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारासती या विहिरीवरती पाणी आणण्यासाठी गेल्याची प्राथमिक माहिती मिळत असून इंदापूर पोलीस आणि महसूल प्रशासन या ठिकाणी दाखल झाले होते. सकाळी साडेसात वाजल्यापासून या मुलीचा शोध घेतला जात होता तबल साडेसहा तासानंतर या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

सारिका पिराजी शिंदे वय 15 वर्षे राहणार परतुर तालुका परतुर जिल्हा जालना ही मुलगी आज सकाळी साडेसात वाजता राजवडी तालुका इंदापूर येथील विहिरी वरती पाणी भरणे कामी गेली असताना पाय घसरून पाण्यात बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.पोलीस प्रशासन महसूल यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतील पाण्याचा साठा बाहेर काढून या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

शिंदे हे कुटुंब मोलमजूरी करणारं कुटुंब आहे. राजवडी या परिसरात एका ठेकेदाराकडे काम करत होते आणि या दरम्यानच आज सकाळी विहिरीवरती पाहण्यासाठी ही मुलगी गेली होती आणि याचवेळी हे दुर्घटना घडली.

संबंधित मुलगी ही विहिरीवरती पाणी आणण्यासाठी गेली होती मात्र ते घरी परतली नसल्याने तिचा शोध सुरू झाला. त्यानंतर विहिरीच्या कडेला तिने आपल्या सोबत नेलेला काही वस्तू आढळून आल्या. त्यानंतर ही मुलगी विहिरीत पाय घसरून पडून बुडाली असावी असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

सकाळी 09 वाजल्यापासून इंदापूर तालुक्याची तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन खुडे आणि इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ई.राऊत यांसह त्यांचं सहकारी पथक घटनास्थळी दाखल होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow