शेतकऱ्यांची वाढवलेली पाणीपट्टी मागे घ्या, हर्षवर्धन पाटील यांची फडणवीसांकडे पत्राव्दारे मागणी

Jun 24, 2024 - 07:22
 0  288
शेतकऱ्यांची वाढवलेली पाणीपट्टी मागे घ्या, हर्षवर्धन पाटील यांची फडणवीसांकडे पत्राव्दारे मागणी

आय मिरर

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाने वाढवलेली शेतकऱ्यांची पाणीपट्टी मागे घेण्यात यावी अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दि.29 मार्च 2022 रोजी आदेश जारी करून कृषी सिंचनासाठी पाणीपट्टीमध्ये वाढ केली आहे. सदरची पाणीपट्टीमध्ये केलेली वाढ राज्य शासनाने मागे घ्यावी, अशा मागणीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहे.

पाटील म्हणाले की,जलसंपदा विभागाकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव तयार कारण्यात आला होता. त्या प्रस्तावास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मार्च 2022 मध्ये मान्यता दिली. मात्र सदरची करण्यात आलेली मोठी दरवाढ शेतकरी वर्गावर अन्यायकारक अशी आहे. सध्या अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने पाणीपट्टीमध्ये केलेली दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी सदर पत्रात केली आहे.

दरम्यान, पाणीपट्टी दरवाढी संदर्भात राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय निश्चितपणे घेईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी आपणांस दिल्याचं ही त्यांनी सांगितलेय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow