निरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात कोसळले दोन शेतकरी,इंदापूर तालुक्यातील काझड येथील धक्कादायक घटना
आय मिरर
मराठवाड्याच्या सात टीएमसी पाण्यासाठी सुरू असलेल्या कृष्णा जलस्थिरीकरणाच्या कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या निरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात इंदापूर तालुक्यातील दोन शेतकरी उतरले आणि हे दोघेही शेतकरी बोगद्यात कोसळल्याची घटना घडलीय.अनिल बापूराव नरूटे आणि रतिलाल बलभीम नरोटे अशी या दोन शेतकऱ्यांची नावे असून ते इंदापूर तालुक्यातील काझड येथील सिध्देश्वर वस्ती येथील रहिवासी आहेत. सध्या त्यांचा शोध घेतला जात आहे.
काझड गावचे हद्दीत नदी जोड प्रकल्प अंतर्गत चालू असलेल्या बोगद्याचे कामाचे ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने हे दोघे खाली उतरत होते.अशी स्थानिकांकडून माहिती मिळत असून यावेळी क्रेन तुटली आणि रतिलाल बलभीम नरोटे वय अंदाजे 50 वर्षे व अनिल बापूराव नरूटे वय अंदाजे 32 वर्षे हे दोघेही बोगद्यामध्ये कोसळले गेले.हे दोघेही सिद्धेश्वर वस्ती काझड येथील रहिवासी असून या बोगद्याची खोली साधारण 250 ते 300 फूट खोल असल्याची अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी ते तावशी हे अंतर नीरा आणि भीमा नदी जोडण्याच्या कामाकरता बोगद्याचे काम सुरू आहे. कळस लाकडी रोडवर कळस पासून ३ ते ४ किलोमिटर अंतरावर काझड गावच्या हद्दीत शिफ्ट क्रमांक ३ मध्ये ही घटना घडली आहे.हे दोघेही स्थानिक शेतकरी असून ते या बोगद्यात उतरले होते आणि याच वेळी त्यांची क्रेन तुटली आणि हा अपघात घडला गेल्याची माहिती पुढे येतेय. ही घटना घडल्यानंतर आता बोगद्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांशी संपर्क साधण्यात आला असून, मोठ्या क्रेनच्या साह्याने या दोघांचा शोध घेतला जाणार आहे.
What's Your Reaction?