हर्षवर्धन पाटलांच ठरलं ! राजवर्धन पाटील अंकिता पाटील ठाकरेंनी ठेवले तुतारीचे स्टेटस
आय मिरर
भाजपचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे आता शरद पवार गटात प्रवेश करण्यात असल्याचं निश्चित झालंय कारण हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारीचे स्टेटस आपल्या व्हाट्सअप ला ठेवले असून आज मुंबईमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली संशोधन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची देखील माहिती मिळतेय.त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून हर्षवर्धन पाटील हे शरचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा होता आता या चर्चांना थेट त्यांच्या घरातूनच दुजोरा मिळाला आहे.
हर्षवर्धन पाटील सध्या भाजपमध्ये आहेत.राजवर्धन पाटील अंकिता पाटील यांनी स्टेटस ठेवल्याने हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाणार हे स्पष्ट झाले आहे.
What's Your Reaction?