विश्वजीत चव्हाण यांचे मारेकरी बारा तासाच्या जेरबंद ! यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

आय मिरर
दौंड तालुक्यातील यवत हद्दीतील निलकंठेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या चव्हाण कुटुंबावरती बुधवारी 5 मार्च च्या रात्री साडेदहाच्या सुमारास अज्ञातांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्यात अविनाश उर्फ विश्वजीत शशिकांत चव्हाण यांचा मृत्यू झाला तर घरातील अन्य तिघेजण गंभीर जखमी झालेत. यानंतर यवत पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासाच्या आत या हल्ल्यातील चार ही आरोपींना जेरबंद केलं आहे.
अटक करण्यात आलेले हे चारही आरोपी उत्तर प्रदेशातील असून सलमान दिलशाद शेख वय - २८ वर्षे,मोमीन अकबर शेख वय-४५ वर्षे, रावतसिंग चौधरी जगदेवसिंग तोमर वय २६ वर्षे आणि गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान वय-२५ वर्ष अशी त्यांची नावे आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख स्वतः या प्रकारात लक्ष घालून होते. या आरोपींच्या शोधासाठी चार ते पाच पोलीस पथक रवाना करण्यात आली होती. त्यांनी हा हल्ला का केला याचा शोध आम्ही घेत असल्याचं पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून यवत पोलीस ठाण्याची दोन पथकं, स्थानिक गुन्हे शाखेची पाच पथके तयार करण्यात आली होती.तपास पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. घटनास्थळाचा परिसर हा दुर्गम असल्याने सीसीटीव्हीचा अभाव होता, घटना झालेनंतर यातील फिर्यादी यांनी परिसरातील लोकांना मदतीस बोलाविले होते, त्यापैकी दोन व्यक्तींनी चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरटे कॅनॉलचे दिशेने रेल्वे रूळाकडे पळून गेल्याचे सांगितले.
सदर व्यक्तींकडे केलेल्या चौकशीत तसेच त्या परिसरात शोध घेतला असता आरोपी पळून गेलेल्या भागात एक संशयित बॅग मिळून आली. त्यामध्ये कपडे व इतर साहित्य मिळून आले.त्यातील एका जर्किंग वरती युनिव्हर्सिटी दिल्ली असे लिहीलेले होते. त्या आधारे आरोपी हे उत्तर भारतातील असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान चार संशयित इसम हे पुणे स्टेशन कडे गेल्याची बातमी गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे तसेच ट्रॅव्हल्स स्टॉपवर आरोपींचा शोध घेतला. यावेळी येरवडा परिसरातील गुंजन थेटर चौकातील ट्रॅव्हल्स थांब्यावरून सलमान दिलशाद शेख आणि मोमीन अकबर शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आले.तर रावतसिंग चौधरी व गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान यांना घटनास्थळाच्या परिसरात त्यांची पडलेली बॅग शोधायला गेले असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिगदार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,यवत पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख,स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, दत्ताजीराव गावडे, कुलदीप संकपाळ, यवत पोलीस स्टेशनचे स.पो.नि.प्रवीण सपांगे, म.स.पो.नि.सुवर्णा गोसावी, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.निरीक्षक अभिजीत सावंत, अमित सिद-पाटील, यवत पोलीस स्टेशन कडील पो.उप.निरीक्षक किशोर वागज, सलीम शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. फौजदार ईश्वर जाधव, हनुमंत पासलकर, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, असिफ शेख, महेश बनकर, अतुल फरंदे, पोलीस हवालदार रामदास बाबर, विजय कांचन, अभिजीत एकशिंगे, राहुल पवार,राहुल घूंबे, मंगेश थिगळे, योगेश नागग्गांजे, रणजीत कोंडके, अमोल शेंडगे, बाळासाहेब खडके, सागर नामदास, तुषार भोईटे, पोलीस अमंलदार मंगेश भगत, निलेश शिंदे, अजय घुले, अतुल डेरे,विभीषण सस्तुरे तसेच यवत पोलीस स्टेशन कडील अमंलदार गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, अक्षय यादव, दत्तात्रय काळे, विकास कापरे, गणेश कुतवळ, विशाल जावळे, प्रमोद गायकवाड, मारुती बागते, प्रणव ननवरे यांच्या पथकाने केली आहे.
What's Your Reaction?






