धक्कादायक : अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार,वडगाव निंबाळकर पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात

आय मिरर
बारामतीत तालुक्यातील एका 11 वर्षीय मुलीवर अंदाजे 40 वर्षे वयाच्या पुरुषाने अत्याचार केल्याची तक्रार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलीय. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अण्णा किसन गोफणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतले आहे.तो बारामती तालुक्यातील मोराळवाडी गावचा आहे.
आज रविवारी दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीच्या राहत्या घरी ही घटना घडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अण्णा गोफणे हा जबरदस्तीने पीडितेच्या घरात शिरला. पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
संबंधित आरोपीला उद्या न्यायालयासमोर हजर केल जाणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांकडून अधिकचा तपास केला जात आहे.
What's Your Reaction?






