इंदापूरच्या उजनी पट्ट्यात शुक्रवारी घुमणार आ.भरणेंचा आवाज ! कांदलगाव - तरडगावात होणार 11 कोटी 92 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उद्घाटन आणि जाहिर सभा
आय मिरर
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं तसं इंदापूर विधानसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागलं आहे.अशातच इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची इंदापूर तालुक्यातील कांदलगाव- तरटगांव मध्ये शुक्रवारी दि.12 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा पार पडणार असून उजनीच्या पट्ट्यात आमदार भरणे मतदारांना नेमकं काय आवाहन करणार आणि विरोधकांवर ही कोणती तोफ डागणार याकडे आत्तापासूनच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कांदलगाव तरटगाव या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 11 कोटी 92 लाख रकमेची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली असून या कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन ही माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. याच दरम्यान कांदलगाव येथे जाहीर सभासुद्धा पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिली.
आमदार भरणे यांच्या प्रयत्नातून मंजूर विकास निधीतून कांदलगांव तरडगांव या भागातील रखडलेली कामे मार्गी लागली आहेत, चांगल्या दर्जाचे रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्याने याचा फायदा या दोन्ही गावांना होणार असल्याचं कोकाटे यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, माजी सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, संजय सोनवणे, सुरेश शिंदे सर इत्यादी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत. तसेच संजय नाना तांबिले, शुभम निंबाळकर, हेमंत पाटील, बाळासाहेब व्यवहारे, बाळासाहेब ढवळे, रमेश शिंदे, स्वप्निल सावंत, पोपट शिंदे, अमर गाडे, नानासाहेब नरूटे, संजय देवकर, दिलीप पाटील, सिताराम जानकर, सचिन खामगळ, हामा पाटील, नाना गवळी, सुनीता निकम, रसिका आरडे, सिद्धेश्वर खराडे लक्ष्मण रेडके, सुभाष गायकवाड, आदित्य शिंदे, अनंता ननवरे, काका खबाले, बाळासाहेब पांढरे, विद्यासागर घोगरे, सोमा जावळे, गणेश शिंगाडे, आबा देवकाते, समाधान देवकर, अशोक गवळी, प्रकाश निकम, विठ्ठल महाडिक, सुभाष डरंगे, हनुमंत चित्राव, नवनाथ खबाले, शरद पाटील, नागेश शिंदे, ह भ प लालासाहेब चोपडे, कैलास देवकर, शिवाजी जगताप, मनोहर भोसले, अण्णा साळुंखे, विजय काटे, दिनेश शिंदे, सतीश चित्राव, विजय शिद, दत्ता देवकर, विष्णू पाटील, हनुमंत जामदाडे,नवनाथ मगर,ह.भ.प. संभाजी टिपाले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन हे समस्त ग्रामस्थ कांदलगाव आणि तरटगाव यांच्याकडून होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिली आहे.
What's Your Reaction?