गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही ! कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? रोहित पवारांनी व्यक्त केला संताप

आय मिरर
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांवर आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास अज्ञातांनी हल्ला चढवला.या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी कुठयं तुमचं कायद्याचं राज्य म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत थेट राजीनामा मागितला आहे.रोहित पवारांनी सोशल मिडीयात एक पोस्ट केलीय.
देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’
गृहमंत्री महोदय…. गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत… रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही.. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाही.. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही! कुठंय तुमचं कायद्याचं राज्य?
आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता… आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या ! असं रोहित पवार यांनी म्हटलयं…
What's Your Reaction?






