संभाजी ब्रिगेडचं नाव बदला ! इंदापूर तहसीलवर शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा

आय मिरर
संभाजी ब्रिगेड विरोधात इंदापूर तहसील कार्यालयावर शिवधर्म फाउंडेशन कडून बेधडक मोर्चा काढण्यात आला आहे.संभाजी ब्रिगेड या संघटनेकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकरी उल्लेख केला जात आहे.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी ब्रिगेडचे नाव बदलण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशन कडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. इंदापूर तहसील कार्यालयाला या मागणीचे निवेदन शिवधर्म फाउंडेशन कडून देण्यात आल आहे.
काय आहे निवेदन...
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र व स्वराज्याचे दुसरे छत्रपती आहेत. त्यांची ख्याती जग विख्यात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे हिंदू धर्माप्रती जे बलिदान आहे ते जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत विसरल जाणार नाही.
म्हणून रयतेने त्यांना धर्मवीर ही उपाधी दिली आणि आज एक संघटना (संभाजी ब्रिगेड) त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करते ही गोष्ट अखंड महाराष्ट्रासाठी लज्जस्पद आहे.
आज संभाजी ब्रिगेड च्या कुठल्याही कामाविषय सोशल मीडियामध्ये असेल किंवा जन माणसांमध्ये असेल चर्चा करत असताना जो पहिला उद्वार निघतो तो "संभाजी" (संभाजी ब्रिगेड) असा आहे. त्यामुळे कळत नकळत रोज लाखो करोडो लोकांकडून आपल्या राज्याचा एकेरी उल्लेख (अपमान) होत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील करोडो शंभूराजे प्रेमीच्या वतीने ही विनंती आहे कि एक तर संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव बदलण्याचे आदेश द्यावे,अन्यथा ह्या संघटना व पक्ष याचे धर्मदाय आयुक्त मार्फत परवाने रद्द करावे. अशी मागणी शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
What's Your Reaction?






