किराणा-मालाचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांची दिवाळी झाली गोड,'मे.लिलाचंद दलुचंद शहा' ला मिळाला भरघोस प्रतिसाद

Nov 14, 2023 - 21:06
 0  622
किराणा-मालाचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांची दिवाळी झाली गोड,'मे.लिलाचंद दलुचंद शहा' ला मिळाला भरघोस प्रतिसाद

आय मिरर

यंदाच्या दिवाळीत किराणा-मालाचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांची दिवाळी झाली गोड झाल्याचं पहायला मिळाले.गेल्या आठवडाभरापासून इंदापूरच्या बाजारपेठेत उत्सवानिमित्त ग्राहकांची किराणा माल खरेदी साठी मोठी गर्दी पहायला मिळाली.

इंदापूर तालुक्यातील शतक पूर्ण करणारी किराणा मालाची व्यापारी पेढी "मे.लिलाचंद दलुचंद शहा" इंदापूर शहरामध्ये गेली शंभर वर्षाहून अधिक काळापासून वडिलोपार्जित चालत आलेली घाऊक व किरकोळ किराणा मालाचे प्रसिद्ध व्यापारी पेढी म्हणुन प्रसिद्ध आहे.या पेढीतून लाखोंची उलाढाल झाली असून सर्वोत्तम दर्जाचा,नामांकित कंपन्यांचा किराणा माल माफक दरात आम्ही ग्राहकांना पुरवल्याचं या पेढीचे व्यवस्थापक नितिन शहा यांनी सांगितले. शिवाय यंदाच्या दीपावली उत्सवात ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून भविष्यात अशी सर्वोत्तम सेवा देण्यास आणि कटीबध्द असल्याचं त्यांनी सांगितले.

पिढ्यापिढ्यांचा विश्वास व सर्वोत्तम प्रतीचा ,उच्च दर्जाचा किराणा माल, वाजवी दर व खात्रीशीर सेवा यामुळे इंदापूर तालुक्यासह बारामती, सोलापूर जिल्ह्यातील अकलुज,टेंभुर्णी, माळशिरस येथील ग्राहकांची प्रथम पसंती मे.लिलाचंद दलुचंद शहा येथे असते.     

गोदरेज सोप,टाटा टी लिमिटेड,सायकल ब्रँड अगरबत्ती, एव्हरीडे सेल व टॉर्च, लिज्जत पापड,लिना-निळ, पॅराशुट तेल व इतर अशा विविध नामवंत कंपनींच्या उत्पादनांचे अधिकृत वितरक आहेत. 

इंदापूर व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष व इंदापूर नगरपरिषदेचे माजी उप-नगराध्यक्ष कै.कन्हैयालाल शहा, कै.नवनितलाल शहा, कै.माणिकचंद शहा यांच्या आशिर्वादाने व प्रदीर्घ अनुभवातून शहा परिवारातील सहावी पिढी हा किराणा व्यापार यशस्वीरित्या चालवीत आहेत.कै.लिलाचंद दलुचंद शहा व कै.गोवर्धनदास लिलाचंद शहा यांच्या पुण्याईने व आशीर्वादाने पुढे सदर व्यवसाय सचोटीने आता वृंदावन शहा,मुकुंद शहा,प्रमोद शहा,नितिन शहा,अमोल शहा,अनुज शहा,व आर्यन शहा यांच्यासह समस्त विश्वासू कर्मचारी-वृंद समस्त ग्राहकांना उत्कृष्टरित्या मालाचे वितरण व विनम्र सेवा देत आहेत.

या पेढीची शहरातील पुणे-सोलापूर मार्गालगत राधिका कॉम्प्लेक्स येथे शाखा आहे. लवकरच या पेढीची अद्ययावत नवीन शाखा प्रशस्त वास्तुमध्ये किराणा,भुसार व इतर मालाचे वितरण करण्यासाठी सुरू होणार आहे.

यंदाही ग्राहकांना दिवाळी उत्सवानिमित्त किराणा माल खरेदीवर शॉपिंग बॅग देण्यात आल्याचे ही शहा यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow