कर्मयोगी व निरा भिमा कारखान्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी रु.25 लाख
आय मिरर
महात्मा फुलेनगर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी रु.25 लाख रक्कमेचा चेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत मंत्रालयात गुरुवारी (दि.19) सुपूर्द केला.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, निरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?