कै.श्री.कन्हैय्यालाल जी.शहा चॅरिटेबल ट्रस्ट कडून दिवाळीसणा निमित्त मिठाई व खाऊचं वाटप
आय मिरर
कै.श्री.कन्हैय्यालाल जी.शहा चॅरिटेबल ट्रस्ट,इंदापूर कडून श्रावणबाळ आश्रम,इंदापूर येथील बालकांना दिवाळीसणा निमित्त मिठाई व खाऊचं वाटप करण्यात आले.यावेळी ट्रस्ट्चे विश्वस्त अनुज शहा म्हणाले, इंदापूर बाजार समितीचे माजी संचालक व इंदापूर नगरपरिषदेचे माजी उप-नगराध्यक्ष कै.कन्हैयालाल शहा यांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे चालविण्यासाठी ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री.वृंदावन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व कै.नवनितलाल शहा यांच्या आशिर्वादाने या ट्रस्टची स्थापना करण्यात आली.
ट्रस्टचे अध्यक्ष मुकुंद शहा यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे सदर सामाजिक कार्यक्रम सचिव अमोल शहा, आर्यन शहा यांच्या समवेत उत्साहपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला.शहा यांनी या आश्रमातील बालचमुंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व भाऊबीज सणानिमित्त मिठाई-खाऊ वाटप करण्यात आले.
शहा पुढे म्हणाले की,या आश्रमातील बालचमुंना दिवाळी-फराळ वाटुन अशाप्रकारे सण साजरा करताना एक अविस्मरणीय अनुभव आला व सदर ट्रस्ट् अशा विविध सामाजिक कार्यासाेबत शैक्षणिक,वैद्यकीय कार्यही करीत असल्याचे नमुद केले.
अशा पद्धतीने दिवाळी भाऊबीज साजरी होणे ,हे आम्हां सर्वांना एक पर्वणीच ठरल्याची भावना अनाथाश्रमातील समस्त बालकांनी व्यक्त केली व ट्रस्टच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल मनापासुन धन्यवाद माणले.सुत्रसंचालन अमोल शहा तर आभार आर्यन शहा यांनी माणले.
What's Your Reaction?