उजनीत मत्स्य बीज सोडण्यासाठी मिळणार निधी, आ.भरणेंच्या मागणीला यश ! अजितदादांचा ग्रीन सिग्नल
आय मिरर
उजनी जलाशय हा जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असल्याने सदर विभागाची मागणी मत्स्य विभागाकडे निधी उपलब्ध करून देण्याबाबत होत असते.परंतु मत्स्य विभाकडे निधी नसल्याने उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडणे याबाबत काहीच मार्ग निघत नाही. त्यामुळे उजनी जलाशयातील मत्स्य संख्या दिवसेंदिवस कमी झाल्याने काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील भोई समाजाने आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे मत्स्यबीज सोडण्याबाबतची मागणी केली होती.
यावर पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडण्यासाठी निधी 8 दिवसांत उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वस्त केले.
आज पुणे येथे नीरा डावा व खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे उजनी जलशयामध्ये मत्स्यबीज सोडण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
या मागणीची दखल घेऊन आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत निधी उपलब्ध करून देणेबाबत आग्रही मागणी केली. त्यावर तात्काळ अजित पवार यांनी ग्रीन सिग्नल दिल्याने आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.
What's Your Reaction?