आज लोणी देवकरच्या सभेत आ.भरणेंच्या निशाण्यावर कोण ? २२ कोटी ६७ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं होणार भूमिपूजन उद्घाटन
आय मिरर(देवा राखुंडे)
लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका जवळ येतील तसं इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापू लागलाय आमदार दत्तात्रय भरणे यांनी तर गेल्या काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमी पूजनांचा धडाकाच लावलाय यासोबतच आमदार दत्तात्रय भरणे जाहीर सभांमध्ये आपल्या विरोधकांना चांगलंच फैलावर घेताहेत.
गुरुवारी सायंकाळी इंदापूरचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर मध्ये 22 कोटी 67 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडणार असून या ठिकाणी होणाऱ्या जाहीर सभेत आमदार दत्तात्रय भरणे यांच्या रडारवर कोण असणार ? याकडे आतापासूनच नजर लागलीय.
लोणी देवकर गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून २२ कोटी ६७ लाख रकमेची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली असून या कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन आ.भरणे यांच्या शुभ हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी दि.१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे.याच ठिकाणी आ.भरणे यांची जाहिर सभासुद्धा पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिली.
आमदार भरणे यांच्या प्रयत्नातून मंजूर विकास निधीतून लोणी देवकर या भागातील रखडलेली कामे मार्गी लागली आहेत. चांगल्या दर्जाचे रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे आसपासच्या गावांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याचं कोकाटेंनी सांगितलं आहे.
या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मधुकर भरणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,श्रीमंत ढोले, अभिजीत तांबिले, कार्याध्यक्ष अतुल झगडे,सचिन सपकळ, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, हेमंत पाटील, संग्राम पाटील, दिपक जाधव, साधना केकाण, नवनाथ रुपनवर, बाळासाहेब करगळ, बापूराव शेंडे, शुभम निंबाळकर , हनुमंत बनसोडे, बाळासाहेब काळे, संदेश देवकर, मनोहर ढुके, साहेबराव चोपडे, सचिन खामगळ, प्रतीक्षा बालगुडे व इतर अनेक मान्यवर व लोणी देवकरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
What's Your Reaction?