महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी राजीव शिरसट

आय मिरर
नुकत्याच पुणे येथे झालेल्या शिक्षक भारती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या सहविचार सभेत जिल्हाध्यक्षपदी डॉ. दादासाहेब जगताप, कार्याध्यक्षपदी इंदापुरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. राजीव शिरसट यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडीनंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेच्या पुणे जिल्ह्यात काम करत असताना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असणारे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही राजीव शिरसट यांनी दिली.
दरम्यान अहिल्यानगर जिल्हा संघटकपदी प्रा.चंद्रशेखर हासे यांना ही नियुक्तीपत्र देण्यात आले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत संपूर्ण राज्यातील जिल्हाध्यक्ष, राज्य कार्यकारिणी पदाधिकारी यांच्यासमवेत चर्चा झाली. संघटनेच्या ध्येयधोरणानुसार संघटनेचा प्रचार, प्रसार करण्याबाबत संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, ज्युनिअर कॉलेज युनिट महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा. जी. टी. पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, धनाजी पाटील आदींसह प्रमुख उपस्थित होते.
या सहविचार सभेस माजी आमदार कपिल पाटील यांनी देखील भेट दिली. तर शिक्षक भारती संघटना पुणे विभागास कार्यालय आणि संघटनेच्या सर्व सभासद, पदाधिकारी यांना ओळखपत्र देण्याची घोषणा बेलसरे यांनी जाहीर केली.याचसोबत अमरावती विभाग शिक्षक मतदार निवडणुकीसाठी सुरेश देवकर यांची उमेदवारी संघटनेच्या वतीने बेलसरे यांनी यावेळी जाहीर केली.
What's Your Reaction?






