शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला सरकारच धोरणच जबाबदार ! सदाभाऊ खोतांचा सरकारला घरचा आहेर

आय मिरर
शेतकऱ्यावर आजचे असलेलं कर्ज आहे ते शेतकऱ्यांच्या चुकीमुळे नाही तर सरकारच्या धोरणामुळे आहे. असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.या कर्जाची जबाबदारी केंद्रांनी आणि राज्याने घ्यावी.परंतु कर्ज माफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही. शेतमालाला भाव मिळणं, बाजारपेठा उभारून करून देणे, आणि खुली अर्थ व्यवस्था शेती क्षेत्रामध्ये निर्माण करणे हा त्यावरचा उपाय आल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटल आहे.
माजी मंत्री सदाभाऊ खोत हे बुधवारी 2 एप्रिल रोजी इंदापूर मध्ये शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी बोलताना खोत म्हणाले की,शेतकऱ्याच जर दारिद्र्य घालवायचं असेल तर घटनेमध्ये शेड्युल 9 मध्ये पंडित नेहरू यांनी 1951 मध्ये जे घुसवले कायदे आहेत ते कायदे रद्द करायला हवेत.मूळ संविधान हे देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांना आवश्यक आहे.शेड्युल 9 मध्ये शेतकरी विरोधी कायदे आहेत. जसं की, अत्यावश्यक वस्तू कायदा,कमाल जमीनधारणा कायदा हे सर्व शेतकरी विरोधी कायदे आहेत. हे कायदे पहिले काढून टाकले पाहिजेत.
एकदा का तुम्ही शेतीवरची बंधने उठवली की, शेतकऱ्यांच्या कंपन्या तयार होतील.ज्यांना शेतीमध्ये राहायचे ते शेतीमध्ये राहतील.ज्यांना बाहेर जायचे ते बाहेर जातील.परंतु हे कायदे रद्द केले तर शेतकरी भूमीहीन होतील, शेतकऱ्यांच्या जमिनी संपुष्टात येतील अशा भंपक कल्पना काही शेतकरी संघटनेचे नेते मांडत आहेत हे पूर्णपणे चुकीच आहे.अस म्हणत सदाभाऊ खोत यांनी शेड्युल 9 मधून अत्यावश्यक वस्तू कायदा आणि कमाल जमीनधारणा कायदा काढून टाकण्याची मागणी केली.
वक्फ बोर्ड कायद्यामध्ये दुरुस्ती आवश्यक : काही कायदे हे काळानुरूप बदलावे लागतात वक्फ बोर्डाचा कायदा ज्यावेळी केला होता, त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. सध्याची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा देशाची फाळणी झाली होती. काही लोक देश सोडून इकडचे तिकडे गेले. तिकडचे इकडे आले होते. काही लोक परत येतील, त्यांच्या मूळ गावी येथील आणि त्यांना त्यावेळी त्या जमिनी देता येतील. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता.
परंतु मोठ्या प्रमाणात जमिनीचे क्षेत्र वक्फ बोर्डाच्या नावावर पडून राहिले आहे.त्या सर्व जमिनी आणि रहिवासी जागा उपयोगात येणे आवश्यक आहे असं मला वाटतं . याच्यामध्ये बदल करण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय केंद्रामधील मोदी सरकारने घेतलेला आहे. परंतु आपल्या देशामध्ये कोणतीही चांगल्या सुधारणा करण्याचा कायदा आला तर त्याला राजकारणाच्या चष्म्यातूनच बघण्याची लोकांची प्रवृत्ती आहे. या विधेयकामध्ये सुधारणा होणं आवश्यक असल्याचं रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
कर्जाला कंटाळून आत्महत्या करू नका : शेतकऱ्यांना विनंती
कर्जमाफीच्या मुद्द्यावर सदाभाऊ खोत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. अजित पवारांच्या शेतामध्ये कुठलं पीक पिकते हे त्यांनाच विचारा असे त्यांनी म्हटलं.त्याचबरोबर सरकार एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत म्हणत आणि दुसरीकडे सरकारमधीलच मंत्र्याच्या कारखान्याचे 296 कोटी कर्ज माफ करते याबाबत प्रश्न खोत यांना विचारला असता ते म्हणाले की, शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये देवा भाऊंच सरकार हे संवेदनशील आहे.
अगदी जलयुक्त शिवार योजनेपासून, अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करण्यापर्यंत, साडेसात एचपी पर्यंत विज शेतकऱ्यांना मोफत देणे, त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांची 46 कोटी विजेची थकबाकी माफ करण्यापर्यंत,दुधाला पाच रुपये अनुदान देण्यापर्यंत, नदीकाठच्या शेतकऱ्याची वाढीव पाणीपट्टी कमी करणे, असे अनेक निर्णय या सरकारने घेतलेले आहेत.
निश्चितपणे हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेईल.परंतु मी या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती करतो बाबांनो तुम्ही आत्महत्या करू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सरकारने जर तुमच्या वर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही छातीचा कोट करून तुमच्यासमोर उभे आहोत. त्यामुळे तुम्ही आत्महत्या करू नका अशी विनंती सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना केली आहे.
भाजप मधील लाभधारक नेत्यांवर साधला निशाणा...
राज्यामध्ये ज्या ज्या वेळी देवा भाऊंना घेरलं गेल त्यात्यावेळी गोपीचंद पडळकर आणि माझ्यासारखी फटाकी माणसं प्रामाणिकपणे लढत होती आणि जे लाभधारक लोक आहेत, जी पक्षाच्या अगदी जवळचे असतील मोठ्या घरातले असतील ती माणसं मात्र शेपट घालून बसलेली होती. आमचं ध्येय होतं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापर्यंत नेणे होते ते पूर्ण झालं. त्यामुळे सदाभाऊ खोतला मंत्रीपद मिळो किंवा नमिळो याच सदाभाऊ खोतला काहीही दुःख नाही. मनामध्ये कोणत्याही प्रकारची निराशा नाही. उलट प्रस्थापितांच्या छातीवर पाय देऊन देवा भाऊ नावाचं वादळ, एक नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये खंबीरपणे उभे राहिलं. या नेतृत्वाला आम्ही साथ देऊ शकलो, हाच आमच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण आहे असं म्हणून सदाभाऊ खोत यांनी मंत्री पद न मिळालं तरी आपण नाराज नसल्याचा म्हटल आहे. मात्र त्याचबरोबर सरकारमध्ये महत्त्वाचं स्थान मिळाल आहे.मंत्रीपद मिळालं आहे त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
What's Your Reaction?






