इंदापूरात 'निमसाखर - पळसमंडळ' बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी जलसमाधी आंदोलन,शरद पवार गटाचे नेते आप्पासाहेब जगदाळेंचा आंदोलनास पाठींबा

Sep 27, 2024 - 16:13
Sep 27, 2024 - 18:48
 0  139
इंदापूरात 'निमसाखर - पळसमंडळ' बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी जलसमाधी आंदोलन,शरद पवार गटाचे नेते आप्पासाहेब जगदाळेंचा आंदोलनास पाठींबा

आय मिरर

इंदापूरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुढाकारातून आज जमसमाधी आंदोलन करण्यात आलेय. इंदापूर व माळशिरस तालुक्याला जोडणाऱ्या नीरा नदीवरील 'निमसाखर - पळसमंडळ' बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी आणि बंधाऱ्याचा वाहुन गेलेला रस्ता पुन्हा निर्माण करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी असा पाठिंबा दर्शवला तर शरद पवार गटाचे नेते आप्पासाहेब जगदाळे यांनी ही या आंदोलनात सहभागी होत राज्य सरकारवर टीका केली.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इंदापूर तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांनी आज शुक्रवारी (दि.२७) निरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार दुपारी बाराच्या सुमारास कार्यकर्ते थेट नदीपात्रात जाऊन घोषणा देऊ लागले. यावेळी सुरुवातीला इंदापूर तालुका शिवसेना (उबाटा) गटाचे संघटक सुदर्शन रणवरे, संजय काळे, भीमराव भोसले, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, गणेश इंगळे, जयंत मोरे, संदीप चौधरी, योगेश कणसे, सागर रणवरे, शुभम कदम, धोंडीराम सोनट्टके, दया भोसले, प्रकाश चव्हाण, अभिजीत तरंगे, विशाल रणवरे हे कार्यकर्ते व शेतकरी निरा नदीच्या पाण्यात उतरून आंदोलन केले.

यावेळी जलसंपदा खात्याचे शाखा अभियंता आर डी झगडे , पाटकरी सुनील सूर्यवंशी , गोविंद रणवरे, नंदकुमार रणवरे ,गोरख शेळके ,राजू पाटील , काशिनाथ रणवरे , अनिल रणवरे , प्रशांत काटे , धनंजय रणवरे , राजू हास्पे यासह अनेक शेतकरी व माळशिरस तालुक्यातील पळस मंडळ येथील ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित होते.

अप्पासाहेब जगदाळे म्हणाले की,शासन हजारो कोटीच्या गप्पा मारतेय पण नीरा नदीवर असणारे दहा-बारा बंधारे दुरुस्त करण्यासाठी दीडशे कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी देऊ शकत नाही का ? जर पाच वर्षात हा प्रश्न सुटू शकत नाही तर तुम्ही शेतकऱ्याचं काय करणार आहात ? 

या बंधाऱ्यावर पाण्याचा प्रश्न तर आहेच परंतु बंधाऱ्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळले जात आहे. शाळेला येणारे जाणारे विद्यार्थी असतील शेतकरी असतील यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जातोय. त्यामुळे तात्काळ या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी.बंधाऱ्याच्या दुरुस्ती करता मंजूर असणाऱ्या निधीमध्ये वाढ करून याठिकाणी पर्यायी मोरी काढून द्यावी.

केवळ याच बंधाऱ्याची अशी परिस्थिती आहे असं नाही तर या बंधाऱ्याच्या खाली पाच बंधारे आहेत. पिठेवाडी येथील बंधाऱ्याची ही अशीच परिस्थिती झाली आहे. त्या बंधाऱ्याची ही तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा चार दिवसांनी तिथेही लोक आंदोलन करतील असा इशाराही यावेळी जगदाळे यांनी दिला आहे. 

बंधाऱ्यावरील रस्ता अरुंद आहे त्यामुळे त्या ठिकाणी बॅरिगेट बसवण्यात यावेत अशी मागणी ही जगदाळे यांनी आंदोलकांच्या वतीने केली आहे.मी केले वर्ष दीड वर्ष झाले या बंदराच्या बाबतीत मागण्या करत आहे. जे बंधारे नादुरुस्त झाले आहेत ते दुरुस्त करण्यापेक्षा त्या ठिकाणी नव्याने बंधारे बांधण्यात यावेत असं ते म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow