वाट्टेल ते सहन करेल पण अपमान नाही ! हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Aug 30, 2024 - 22:01
Aug 30, 2024 - 22:53
 0  442
वाट्टेल ते सहन करेल पण अपमान नाही ! हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

आय मिरर

इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आणि त्यानंतर भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार याच्या चर्चा सुरु झाल्या. यानंतर हर्षवर्धन पाटलांची शरद पवारांसोबत जवळीक वाढल्याचं पहायला मिळालं. हर्षवर्धन पाटील आता शरद पवारांच्या गटात प्रवेश करतील हे जवळपास निश्चित मानला जातयं.

गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटलांच्या अपक्षाच्या चर्चा होत्या. कारण इंदापूरच्या जागेबाबत महायुतीत तेढ निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यातचं अजित पवारांनी इंदापूरच्या जनसन्मान यात्रेत दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत देत युतीत मिठाचा खडा टाकला.

पाटील इंदापूर तालुका विकास आघाडीतून उद्याची विधानसभा लढवतील अशा चर्चा असताना पुण्यात शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली.त्यानंतर आज शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी बावड्यातील जनसंवाद मेळाव्यात मला सर्वांचे फोन येत आहेत,त्याचा नीट अर्थ समजून घ्या.अद्याप मी कोणालाही होकार दिला नाही. असं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं.तर याच मेळाव्यात हर्षवर्धन पाटलांसमोर कार्यकर्त्यांनी रामकृष्णहरी वाजवा तुतारी असा नाराही दिला.त्यामुळे समरजित घाटगे यांच्या नंतर हर्षवर्धन पाटील पवारांच्या गटात सहभागी होतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

अजित पवार बोलले तो महायुतीतील धर्म नाही.जागावाटप झालं नसताना हा अधिकार महायुतीतील एका पक्षाला दिला कसा काय ? असा प्रश्न ही हर्षवर्धन पाटलांनी उपस्थित केला आहे.हर्षवर्धन पाटलांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेवर टोकाचं वक्तव्य केल.मी कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नसताना या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला तर इंदापूर तालुक्यातील सामान्य माणसांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? या गोष्टी चांगल्या नाहीत, हर्षवर्धन पाटील आयुष्यात सर्व काही सहन करेल पण अपमान सहन करणार नाही असं हर्षवर्धन पाटलांनी बावनकुळे यांना खनकावून सांगितलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow