Viral Post | इंदापूरात त्या पोस्टर ची का रंगलीय चर्चा ; वाचा सविस्तर

Sep 27, 2024 - 16:48
Sep 27, 2024 - 20:48
 0  510
Viral Post | इंदापूरात त्या पोस्टर ची का रंगलीय चर्चा ; वाचा सविस्तर

आय मिरर

प्रत्येक विधानसभेला इंदापूर विधानसभा मतदार संघाची राज्यात चर्चा रंगते.यंदाही ती तितक्याच जोराने रंगलीय.शरद पवार गटाकडून आप्पासाहेब जगदाळे की प्रवीण माने यापैकी कोण मैदानात असणार की हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेऊन इंदापूरची खिंड लढवणार ! अशा चर्चा असताना काल रात्री पासून इंदापूर तालुक्यातील विविध वाॅटस् अँप ग्रुप वर युवानेते युगेंद्र पवारांचे पोस्टर व्हायरल होताहेत.

दुसरीकडे नव्या आकाशी नवी भरावी,हाती आपल्या विजयाची तुतारी ! अशा आशयचा एक व्हिडिओ देखील हर्षवर्धन पाटील समर्थकांकडून सोशल मिडियात व्हायरल केला जातोय.

"इंदापूर तालुक्यातील मतदारांच्या मनात नको आजी नको माजी इंदापूर तालुक्याला हवाय नवीन बाजी" अशा आशयाचे हे पोस्टर असून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून ते व्हायरल केले जात असल्याने शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना इंदापूर मधून तर लाँन्च केलं जात नाही ना ? अशी चर्चा आता रंगू लागलीय

बारामतीच्या आखाड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढल्यानंतर या यात्रेला त्याच ताकतीने टक्कर देण्यासाठी शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवारांनी स्वाभिमानी यात्रा काढली. बारामतीचं मारण्यासाठी युगेंद्र पवार हे उंबरठा ना उंबरठा झिजवताहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांना युगेंद्र पवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या ताकदीने कडवं आव्हाण देतील अशा ही चर्चा आहेत. मात्र अस असताना आणि इंदापूर मध्ये अप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने हे पवार गटाकडून इच्छुक असताना अचानकपणे सोशल मीडियात युगेंद्र पवारांच्या पोस्ट पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीच प्रसारित केल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलय.

पोस्टच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटलांच्या इनकमिंगला विरोध…

गेल्या काही दिवसापासून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा आहेत. महायुतीचे जागावाटप अद्याप झाले नसून महायुतीच्या जागा वाटपात इंदापूरची जागा राष्ट्रवादीच्या गोठात आहे.त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्यास विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात असतील. असं झाल्यास भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे अपक्ष किंवा शरद पवार गटात प्रवेश करून तोताऱ्याच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरतील. याच हर्षवर्धन पाटील यांच्या इन्कमिंगला राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून विरोध दर्शवला आहे अशीही चर्चा आहे. इंदापूरचे नेतृत्व करण्यासाठी आम्हाला आजी-माजी चेहरा नको तर नवीन चेहरा हवा आहे असा संदेशही या पोस्टच्या माध्यमातून देण्यात आला आहे.त्यामुळे हर्षवर्धन पाटील भविष्यात शरद पवार गटात प्रवेश करतील की नाही याबाबत ही प्रश्न उपस्थित झाला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow